Satan Shoes: मानवी रक्तानं तयार केलेले 'सैतान शूज' वादात; किंमत ऐकून व्हाल हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 04:58 PM2021-03-31T16:58:02+5:302021-03-31T16:59:43+5:30
'सैतान शूज' (Satan Shoes) सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत. सैतान शूज तयार करताना यातील लाल रंगासाठी मानवी रक्ताचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. याच गोष्टीवरुन हे शूज आणि निर्माती कंपनी आता वादात सापडली आहे.
'सैतान शूज' (Satan Shoes) सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहेत. सैतान शूज तयार करताना यातील लाल रंगासाठी मानवी रक्ताचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे. याच गोष्टीवरुन हे शूज आणि निर्माती कंपनी आता वादात सापडली आहे. ब्रूकलिन कंपनीनं (Brooklyn Company) या शूजची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर या शूजवर जोरदार टीका केली आहे. तर सुप्रसिद्ध नाईकी (Nike) कंपनीनंही हे शूज तयार करणाऱ्या MSCHF या कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. कंपनीची कोणतीही परवानगी किंवा कल्पना न देता या शूजवर नाइकी कंपनीचा लोगो वापरण्यात आला आहे, असा आक्षेप नाइकीनं घेतला आहे.
MSCHF कंपनीने सैताना शूज' २९ मार्च रोजी बाजारात आणले. कंपनीनं हे शूज सुप्रसिद्ध रॅपर लिल नाससोबत (Lil Nas) पार्टनरशिप करत तयार केले आहेत. AFP वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, २१ वर्षीय रॅपर लिल नास याचा नुकताच डेविल लॅप डान्स व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला होता. याच व्हिडिओमुळे अमेरिकेचे गर्व्हनर देखील संतापले होते. रॅपर लिल नास यानं MSCHF कंपनीसोबत मिळून ‘सैतान शूज’ (Satan Shoes) बाजारात आणणार असल्याचं सांगितलं होतं.
Satan would be really pissed when he finds out Nike won't pay royalties for the new shoes by Lil Nas X #satanshoespic.twitter.com/ChcE2vq2S9
— Darsh Kotasthane 💸💸💸 (@Darsh_307_) March 30, 2021
बुटांच्या फक्त ६६६ जोडींची निर्मिती
न्यूयॉर्कच्या ब्रूकलिन कंपनीसोबत मिळून तयार केले गेलेल्या 'सैतान शूज'च्या केवळ ६६६ जोडीच उत्पादन केलं गेलं आहे. एका जोडची किंमत जवळपास १०१८ डॉलर म्हणजे ७५ हजार रुपये इतकी आहे. शूजवर लाल रंगासाठी मानवी रक्ताचा वापर केला गेला आहे. 'नाइकी'नं शूज निर्माती कंपनीवर परवानगीविना कंपनीचा लोगो वापरल्याचा ठपका ठेवला आहे. नाइकी कंपनीचा या प्रोजेक्टसोबत कोणताच संबंध नसल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आलं आहे.
Nike wants Lil Nas X 'Satan Shoes' destroyed amid boycott threats https://t.co/RoL5cnic1Fpic.twitter.com/fMJsPbk69X
— New York Post (@nypost) March 31, 2021
शूजवरचा पंचकोन वादात
सोशल मीडियावर या शूजबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. शूजच्या डिझाइनवरुन देवतांचा अपमान केल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. शूजवर पेंटाग्राम म्हणजेच पंचकोनाचं निशाण आहे. यह निशाण 'सैताना'चं प्रतिक मानलं जातं. याशिवाय बायबल ग्रंथानुसार ल्यूक १०:१८ चा देखील यावर उल्लेख आहे. कंपनीच्या दाव्यानुसार शूजच्या निर्मितीमध्ये मानवी रक्ताचा उपयोग केला गेला आहे.