'लग्न हेच ​​माझ्या तब्येतीचे रहस्य', पाचव्या लग्नानंतर ९० वर्षीय 'आजोबा' म्हणाले, आता आणखी लग्न करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:15 AM2023-07-17T11:15:48+5:302023-07-17T11:16:15+5:30

सौदी अरेबियामध्ये एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या पाचव्या लग्नामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

saudi arabia oldest groom married for the fifth time says he wants to remarry and have more kids | 'लग्न हेच ​​माझ्या तब्येतीचे रहस्य', पाचव्या लग्नानंतर ९० वर्षीय 'आजोबा' म्हणाले, आता आणखी लग्न करणार

'लग्न हेच ​​माझ्या तब्येतीचे रहस्य', पाचव्या लग्नानंतर ९० वर्षीय 'आजोबा' म्हणाले, आता आणखी लग्न करणार

googlenewsNext

लग्न हे आयुष्यातील सर्वात महत्वाचे काम आहे. आपल्या प्रत्येकाला लग्न करण्याची इच्छा असते, पण लग्न आयुष्यात एकदाच केले जाते. वयाच्या ३५ किंवा ४० पर्यंत आपण लग्न करतो. पण, सध्या सौदी अरेबियाच्या सोशल मीडियामध्ये एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या पाचव्या लग्नामुळे चर्चेत आहेत. एक ९० वर्षीय व्यक्ती पाचव्या लग्नासह सौदी अरेबियाचा सर्वात वयस्कर वर बनला आहे.वयस्कर व्यक्ती आपल्या पाचव्या पत्नीसोबत फिरायला गेले आहेत आणि भविष्यात त्यांना आणखी लग्न करायचे आहे, असंही त्या व्यक्तीने सांगितले आहे. नादिर बिन दहीम वाहक अल मुर्शिदी अल ओतैबी यांनी सौदीच्या अफिफ प्रांतात त्यांचे पाचवे लग्न साजरे केले.

सोशल मीडियावर या वृद्धाचा एक व्हिडिओही समोर आला आहे, यामध्ये नेटकरी त्यांना पाचव्या लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. व्हिडिओमध्ये ते वयस्कर व्यक्ती आनंदी असल्याचे दिसतंय आणि त्यांच्या नवीन लग्नासाठी खूप उत्साहित दिसत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांचा एक नातू म्हणतोय, 'आजोबा तुम्हाला निकाहसाठी शुभेच्छा, मी तुम्हाला सुखी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.' सौदीच्या सर्वात वयस्कर वराने दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल आपले मत व्यक्त केले. अविवाहितांनी लग्न करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

स्वस्त क्रुड ऑईल खरेदी करून कमावला नफा, आता सरकारी कंपन्या का कमी करत नाहीयेत इंधनाचे दर? 

'या लग्नानंतर मला पुन्हा एक लग्न करायचं आहे, विवाहित जीवन हे सर्वात शक्तिशाली आहे, हे अल्लाहसमोर विश्वास आणि अभिमानाची गोष्ट आहे. लग्न केल्याने जीवनात शांती आणि संसारात समृद्धी येते. लग्न हे माझ्या चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे. जे युवक लग्न करण्यास कचरतात, मी त्या तरुणांना विनंती करतो की त्यांनी धर्म वाचवण्यासाठी आणि पूर्ण आयुष्य जगण्यासाठी लग्न करावे, असंही त्या व्यक्तीने मुलाखतीत सांगितले आहे. 

सध्या हे लग्न सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्यांनी कमेंट करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Web Title: saudi arabia oldest groom married for the fifth time says he wants to remarry and have more kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.