१० वर्षांपूर्वी शाळकरी मुलानं केलेली भविष्यवाणी होतेय व्हायरल; २०२० बद्दल म्हणाला होता की.....
By manali.bagul | Published: December 30, 2020 04:11 PM2020-12-30T16:11:01+5:302020-12-30T16:21:00+5:30
Trending Viral News in Marathi : सध्या सोशल मीडियावर एका शाळकरी मुलाची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. ही भविष्यवाणी पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल, ही चुकिची भविष्यवाणी होती.
२०२० कसं असेल याची भविष्यवाणी आतापर्यंत कोणीही करू शकलेलं नाही. सुरूवातीला प्रिंस हॅरी आणि मेघन यांच्या वेगळ्या होण्याने सुरूवात झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आग लागली. त्यानंतर सुरूवात झाली ती कोरोनाच्या माहामारीला. २०२० मध्ये जगभरात अनेक मोठे बदल घडून आले. सध्या सोशल मीडियावर एका शाळकरी मुलाची भविष्यवाणी व्हायरल होत आहे. ही भविष्यवाणी पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल, ही चुकिची भविष्यवाणी होती.
Two very rough predictions from 5th graders in 2010.
— Freezing Cold Takes (@OldTakesExposed) December 24, 2020
(Via @ian_mac5) pic.twitter.com/3A2wMWN08s
केविन सिंहची ही भविष्यवाणी ट्विटरवर व्हायरल होत आहे. त्यानं दहा वर्षांपूर्वी एका पुस्तकात २०२० बद्दल भविष्यवाणी केली होती. ज्यात त्यानं नमुद केलं होतं की, २०२०मध्ये शांतता आणि मानवता दिसून येईल. २०२० मध्ये प्रत्येक आजाराचे उपचार केले जातील. पण असं काहीही झालेलं नाही. उलट कोरोनाच्या जीवघेण्या आजारामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला.
I never seen a jinx work so well https://t.co/RoLmjl382M
— BossLogic (@Bosslogic) December 26, 2020
केविन सिंहने या पुस्तकात लिहिले होते, की, २०२० ची माझी भविष्यवाणी अशी आहे की, सगळेजण शांततापूर्ण वातावरणात राहतील. सगळे आजार बरे होतील. त्यांच्या शाळेच्या पुस्तकात एका चित्राच्या माध्यमातून ही भविष्यवाणी मांडण्यात आली होती. सध्या हाच फोटो व्हायरल होत आहे. या भविष्यवाणीला ट्विटरवर ७० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. बाबो! पाण्याच्या टाकीवर जाऊन उभा राहिला बैल; अन् लोक म्हणाले मौसी को बुलाओ रे.......
मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ही भविष्याणी व्हायरल होत आहे. तसंच केविनला या भविष्यवाणीसाठी दोषी ठरवलं जात आहे. अर्थात ही भविष्यवाणी खोटी ठरली. केविन सांगितल्याप्रमाणे काहीही झालं नाही. त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर केविनने माफी मागितली आहे. खोदकाम करताना सापडलं २ हजार वर्ष जुनं कँटिन; अन् डब्बा उघडताच दिसलं असं काही, पाहा फोटो