VIDEO : पाण्यात काहीतरी शोधत होते स्कूबा डायव्हर्स, अचानक आला भीषण भूकंप आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 01:34 PM2023-11-18T13:34:47+5:302023-11-18T13:36:59+5:30
Viral Video : व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे.
Viral Video : भूकंपाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. यात किती नुकसान होतं किंवा किती लोकांचा जीव जातो हेही अनेकदा बघायला मिळतं. पण जेव्हा कुणी पाण्यात असेल आणि तेव्हा भूकंप आला तर काय होईल? असा नजारा क्वचितच कधी बघायला मिळतो. हेच दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. काही डायव्हर्स समुद्रात काहीतरी शोधत होते. तेव्हा अचानक भूकंप आला. याचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर व्हायरल झाला आहे. इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल झाला.
व्हिडिओत डायव्हर्स आपलं काम करत असताना दिसतात. यात सगळंकाही शांत आणि सुंदर दिसत आहे. मासे इकडून तिकडे फिरताना दिसतात. तेव्हाच एक वेगवान लाट डायव्हर्सना विरूद्ध बाजूला फेकण्याआधी आपल्याकडे खेचते. व्हिडिओच्या शेवटी मलबा सगळीकडे उडताना दिसत आहे. अशात डायव्हर्स त्यांच्या वस्तू पकडण्यासाठी हालचाल करतात.
Magnitude 7.2 earthquake as seen underwater. pic.twitter.com/M94JxGyEEp
— Noble Ron (@perry_ron) November 12, 2023
सगळं काही सामान्य होण्याआधी व्हिडीओ संपतो. पण हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना या व्यक्तीने कमेंट केली की, मस्त, आता मी भूकंपादरम्यान समुद्रात राहणं आपल्या लिस्टमध्ये अॅड केलं आहे. दुसऱ्या एकाने लिहिलं की, एका डायव्हरने दगड असा पकडला आहे जणू तो पृथ्वीसोबत हलत आहे. पण स्थिर होतं. हा वेडेपणा आहे.