Sea Wave Video: समुद्राच्या लाटांचा ढगांना स्पर्श, पाहा डोळ्याचे पारणे फेडणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 05:50 PM2022-05-05T17:50:41+5:302022-05-05T17:51:13+5:30
Sea Wave Touching Clouds Video: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये समुद्राची एक मोठी लाट ढगांना स्पर्श करताना दिसत आहे.
Sea Wave Touching Clouds: सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात, ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. व्हिडिओमध्ये समुद्राच्या उंच लाटा दिसत आहेत. तुम्ही म्हणाल, त्यात काय विशेष? विशेष म्हणजे, या लाटा चक्क ढगांना स्पर्श करत आहेत.
Perfect wave touching the clouds.. pic.twitter.com/93RsgS3YvC
— Buitengebieden (@buitengebieden) May 3, 2022
गगनचुंबी लाटा...
व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राची एक मोठी लाट दिसत आहे. ही लाट उतकी उंच जाते की, तिचा चक्क ढगांनाच स्पर्श होतो. अशाप्रकारच्या लाटा क्वचितच कुणी पाहिल्या असतील. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्राची लाट ढगांमधून जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. 37 सेकंदांचा हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत 15 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
हवेत दिसणारे एरोसेल
हे दृष्य पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की समुद्राच्या लाटा इतक्या उंच कशा जात असतील? तुम्हाला वाटत असेल की, व्हिडिओमध्ये छेडछाड केली गेली आहे. पण, ही घटना अगदी सत्य आहे. मात्र, व्हिडिओमध्ये दिसणारे ढग वास्तविक नसून एरोसोल आहेत. एरोसोल सूक्ष्म कण किंवा द्रव थेंबांच्या स्वरुपात हवेत असतात. हे समुद्राच्या वर आणि टेकड्यांभोवती दिसतात. ते दिसायला अगदी ढगांसारखे असतात. या व्हिडिओंमध्येही समुद्राच्या लाटा एरोसोलवर आदळल्याचे दिसत आहे.