Security guard eating rice with onion garlic : कुटुंबासाठी काहीपण! सिक्युरिटी गार्डला कच्चा कांदा अन् लसणासह भात खाताना पाहून नेटीझन्स भावूक....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:08 PM2021-04-01T17:08:06+5:302021-04-01T17:20:58+5:30
Security guard eating rice with onion garlic : स्वतःचा लहान मोठा बिझसनेस किंवा मिळेल ती नोकरी स्विकारण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या अनेक भागात मिळेल ते काम करून लोक आपली भूक भागवत आहेत.
सोशल मीडियावर नेहमीच अशा घटना समोर येत असतात ज्या पाहून आपलं मन हळवं होतं. कोरोनाच्या माहामारीनंतर देशभरातील अनेक लोकांसाठी आपलं घर चालवणं हेच मोठं आव्हान ठरलं आहे. अनेकांची नोकरी गेली तर कोणाला कामाचा ताण. त्यामुळे आता स्वतःचा लहान मोठा बिझसनेस किंवा मिळेल ती नोकरी स्विकारण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. भारताच्या अनेक भागात मिळेल ते काम करून लोक आपली भूक भागवत आहेत.
सध्या सोशल मीडियावर एका असा फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक सिक्यूसिटी गार्ड (security guard) भात कच्चा कांदा आणि लसणासह खात आहेत. मलेशियातील सिक्यूरिटी गार्डचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबूकवर एपिट लिड (Apit Lid) नावाच्या युजरनं हे फोटो शेअर केले आहेत. काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS म्हणाले....
या पोस्टमध्ये दोन फोटोज दिसून येत आहेत. पहिल्या फोटोत सिक्यूरिटी गार्ड जेवत आहे तर दुसऱ्या फोटोत जेवण दाखवण्यात आलं आहे. या डब्यात तुम्ही पाहू शकता कच्चा कांदा आणि लसूण ठेवला आहे. बर्याच लोकांनी या सिक्यूरिटी गार्डवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या कुटुंबीयांवरील बिनशर्त प्रेमाचेही लोकांनी कौतुक केले. एका फेसबुक युजरनं लिहिले की, "अशा प्रकारची माणसं कमी होत आहेत . ते मजबूत राहू शकतात का?"अशा प्रश्नही उपस्थित केला आहे. कार लावून किराण्यात सामान आणायला गेला; अर्धवट उघड्या खिडकीतून १५०० मधमाश्या आत शिरल्या; अन् मग...