अद्भूत असे काही! एक असा फोटोग्राफर ज्याला वाघ, बिबटे अन् हत्तीच नाही तर सापसुद्धा 'पोज' देतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:36 AM2020-07-25T11:36:26+5:302020-07-25T11:42:54+5:30
मिथुन एच यांनी वेगवेगळ्या जंगलात जाऊन या प्राण्यांचे फोटो काढले आहेत. जे इतर फोटोंपेक्षा वेगळे दिसतात. या फोटोंंमध्ये केवळ प्राणी नाही तर निसर्गाचा अद्भूत नजाराही बघायला मिळतो.
(All Image Credit : instagram.com/mithunhphotography)
मिथुन एच एक वाइल्डलाइफ फोटोग्राफर आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर प्राण्यांचे एकापेक्षा एक भारी फोटो शेअर केले आहेत. जंगलातील प्राण्यांचे हे अद्भूत फोटो पाहून आपण एका वेगळ्याच विश्वास गेल्याचा अनुभव येतो. त्यांचा एक नुकताच काढलेला बिबट्याचा आणि ब्लॅक पॅंथरचा एकत्र फोटो सध्या फारच चर्चेचा विषय ठरतोय. मिथुन यांनी सांगितले की, ब्लॅंक पॅंथरचं नाव आहे साया आणि बिबट्याचं नाव आहे क्लियोपात्रा. क्लियोपात्रा मादा बिबट्या आहे तर पॅंथर नर आहे. या दोन प्राण्यांच्या फोटोंच्या निमित्ताने त्यांनी काढलेले इतरही फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे त्यांचे काही खास फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
मिथुन एच यांनी वेगवेगळ्या जंगलात जाऊन या प्राण्यांचे फोटो काढले आहेत. जे इतर फोटोंपेक्षा वेगळे दिसतात. या फोटोंंमध्ये केवळ प्राणी नाही तर निसर्गाचा अद्भूत नजाराही बघायला मिळतो.
मिथुन यांच्या इन्स्टावर देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांनी The Real Black Panther नेट जिओसाठीही काम केलं आहे. त्यांच्या फोटोग्राफीचा एक मोठा चाहता वर्ग आहे. त्यांना सोशल मीडियावर फॉलो करणारे अनेक फॅन्स आहेत. त्यांचे एकापेक्षा एक भारी क्लिक केलेले फोटो तुम्ही इन्सावर पाहू शकता.