तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 08:03 AM2020-05-30T08:03:45+5:302020-05-30T08:04:16+5:30

या युजरने ट्विट केले की, दरवेळी मी तुला पाहतो आणि तुझा आवाज ऐकतो तेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतो.  हे ट्विट पाहिल्यानंतर स्वरा भास्करनेही त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिला.

Seeing your face changes my mind about marriage trolling Swara Bhaskar on twitter pnm | तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा

तुझं तोंड पाहिलं तरी माझा लग्नाचा विचार बदलतो; युजर्सच्या ट्रोलवर काय म्हणाली स्वरा भास्कर? पाहा

Next

नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असून तिचे ट्विट अनेकदा चर्चेचे विषय बनले आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर प्रत्येक विषयावर आपले मत बिनधास्तपणे मांडते, त्यामुळेच तिला बऱ्याचदा ट्रोल केले जाते. परंतु आता एका युजरने विनाकारण स्वरा भास्करला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याला स्वरा भास्करने योग्य उत्तर दिले.

या युजरने ट्विट केले की, दरवेळी मी तुला पाहतो आणि तुझा आवाज ऐकतो तेव्हा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतो.  हे ट्विट पाहिल्यानंतर स्वरा भास्करनेही त्याला जबरदस्त प्रत्युत्तर दिला. स्वरा भास्करने या ट्विटला उत्तर देताना लिहिलं आहे की, चांगली रणनीती..तुम्ही स्वतःला बर्‍याच रिजेक्शनपासून वाचवलं आहे. या दोघांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक युजरने स्वराला ट्रोल करताना लिहिलं की, रिजेक्ट तर तुला जनतेने केले आहे, स्क्रीनवरुन आणि नेतेगिरीतूनही, लहानपणापासूनच तुमचा शहाणपणा, लॉजिक आणि कॉमन सेन्स शत्रुत्व राहिले आहे. तुम्हीच स्वत: ला थोपवलं असेल तर जनतेने काय करावे? अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर दुसऱ्या एका युजरने त्या मुलाला फटकारताना सांगितले की, अहो, रिजेक्शन सोडून द्या, कदाचित एखाद्या मुलीने याच्याकडे पाहिलेही नसेल. त्याचसोबत अन्य युजरने म्हणतो, भाऊ, तू आरसा पाहिला नसशील, तर कुणीतरी मुलाला सॉरी म्हणून निघून जाण्यास सुचवले.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत अनेक प्रवासी मजूर, विद्यार्थी व महिलांना त्यांच्या घरी पोहचवले आहे. आता या मोहिमेत अभिनेत्री स्वरा भास्करही सामील झाली आहे. आतापर्यंत स्वराने दिल्लीत अडकलेल्या १३५० प्रवासी मजूरांना बिहार व उत्तर प्रदेशमधील त्यांच्या घरी पोहचवले आहे. अभिनेत्री स्वरा भास्करने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अशा वेळी जेव्हा लाखो लोक रस्त्यावर आले आहेत. अत्याधिक कष्टाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत मी घरी बसले आहे, याची मला लाज वाटते. या संकटात आपल्या व्यवस्थेमधील नाकर्तेपणादेखील प्रकाशझोतात आला आहे अशा प्रकारचा आरोप तिने केला होता.

Web Title: Seeing your face changes my mind about marriage trolling Swara Bhaskar on twitter pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.