बाबो! 3 वर्षाच्या मुलाने टाकला चुकीचा पासवर्ड, ४८ वर्षांसाठी लॉक झाला आयपॅड!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 01:02 PM2019-04-09T13:02:34+5:302019-04-09T13:06:17+5:30

लहान मुलांपासून आपल्या महत्त्वाच्या वस्तू, खासकरून मोबाइल, कॉम्प्युटर आणि टॅबलेट का दूर ठेवावे, हे तुम्हाला ही बातमी वाचून कळेल.

Shocking! Baffled dad locked out of iPad for 48 years after three year son tried to guess password | बाबो! 3 वर्षाच्या मुलाने टाकला चुकीचा पासवर्ड, ४८ वर्षांसाठी लॉक झाला आयपॅड!

बाबो! 3 वर्षाच्या मुलाने टाकला चुकीचा पासवर्ड, ४८ वर्षांसाठी लॉक झाला आयपॅड!

Next

लहान मुलांपासून आपल्या महत्त्वाच्या वस्तू, खासकरून मोबाइल, कॉम्प्युटर आणि टॅबलेट का दूर ठेवावे, हे तुम्हाला ही बातमी वाचून कळेल. अमेरिकेतील ओसनॉस पत्रकार आहेत. त्यांना ३ वर्षांचा एक मुलगा आहे. इवान काही कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान त्यांच्या मुलाने इवानच्या पर्सनल iPad चा पासवर्ड उघडण्याचा प्रयत्न केला. अर्थातच त्याने अनेकवेळी चुकीचा पासवर्ड टाकला, त्यानंतर आता इवान यांचा आयपॅड चक्क ४८ वर्षांसाठी लॉक झालाय.

इवानने ट्विटरवर त्यांचा हा किस्सा शेअर केला आहे आणि लोकांकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. त्यांनी त्यांच्या आयपॅड स्क्रीनचाही फोटो शेअर केला आहे. इवानने फोटो शेअर करताना असेही लिहिले आहे की, 'हे तुम्हाला खोटं वाटू शकतं. पण हा माझा आयपॅड आहे. माझ्या तीन वर्षाच्या मुलाने हा अनलॉक करण्याचा प्रयत्न केला. काही आयडिया आहे?'


ट्विटरवर एका यूजरने सांगितले की, त्याने Apple मध्ये काम करणाऱ्या एका मित्राला विचारले. त्याने सांगितले की, आता तुम्ही या डिवाइसचा कधीही वापर करू शकणार नाही. त्यांचे मित्र म्हणाले की, 'आम्ही यात काहीच करू शकत नाही'.


पण त्या मित्राने एक उपायही सांगितला आहे की, iPad कॉम्प्युटरला जोडून iTunes च्या मदतीने Device Firmware Update mode मध्ये टाकला जाऊ शकतो. याने आयपॅडमधील सर्व डेटा नष्ट होईल. पण यानेही काम होईल की नाही शंकाच आहे.



यावर काही लोकांनी गंमतही केली आहे. एक यूजर म्हणाला की, 'एक-दोनदा पुन्हा चुकीचा पासवर्ड ट्राय करा. कदाचित टायमर फेल होईल आणि आयपॅड अनलॉक होईल'.

Web Title: Shocking! Baffled dad locked out of iPad for 48 years after three year son tried to guess password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.