Shocking! कपलच्या सेल्फीमध्ये कैद झाला 'मृत्यू', फोटो बघून सगळेच झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:28 PM2021-08-16T12:28:28+5:302021-08-16T12:39:45+5:30
सोफी पासने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आणि कशाप्रकारे ते एका मोठ्या दुर्घटनेतून वाचले हेही तिने सांगितलं.
असं म्हणतात की, मृत्यू दिसत नाही. पण एका महिलेने असा 'डेथ सेल्फी' शेअर केला आहे ज्याने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. हा सेल्फी ज्यांनीही पाहिला ते हैराण झालेत. हा सेल्फी स्कॉटलॅंडच्या नॉर्थमध्ये एका वाइल्ड स्वीमिंग टूरवर सोफी पास नावाच्या महिलेने आपल्या पार्टनरसोबत घेतला होता.
स्कॉटलॅंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेलेलं कपल सोफी पास आणि तिचा पती रिचर्डसोबत एक धक्कादायक घटना घडली. दोघेही पावसात स्कॉटलॅंडला फिरायला गेले होते. यादरम्यान अचानक त्यांच्या सेल्फीमध्ये असं काही रेकॉर्ड झालं, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती.
Mirror च्या रिपोर्टनुसार, सोफी आणि रिचर्ड जेव्हा सेल्फी घेत होते तेव्हा पाऊस येत होता. सेल्फी क्लीक होत असताना दोघांना जाणीव झाली की, काहीतरी मोठी दुर्घटना होणार आहे. अचानक एलेक्ट्रोमॅग्नेटमुळे सोफीचे केस हवेत वरच्या दिशेने उडत होते. रिचर्ड आणि सोफीला काहीतरी भयंकर घडणार याची जाणीव झाली आणि ते तेथून पळालेल.
सोफी जेव्हा सेल्फी घेत होती तेव्हा रिचर्डने बघितलं की, सोफीचे केस वरच्या दिशेने उडत आहेत. त्याने लगेच सोफीचा हाथ पकला आणि धावू लागला. पळून जाताना जर काही सेकंद आणखी उशीर झाला असता तर दोघांचा जीव गेला असता. कारण ज्या ठिकाणी ते सेल्फी घेत होते, तिथे काही सेकंदातच वीज पडली.
सोफी पासने हा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आणि कशाप्रकारे ते एका मोठ्या दुर्घटनेतून वाचले हेही तिने सांगितलं. सोशल मीडिया यूजर्स त्यांचा हा डेथ सेल्फी पाहून हैराण झाले आहेत. हा फोटो व्हायरल झाला आहे.
सोफीने जनतेला संदेश दिला की, पावसात मोकळ्या ठिकाणी फिरायला जाणं घातक ठरू शकतं. सुदैवाने या सेल्फीमुळे त्यांना धोका समजला आणि त्यांनी मृत्यूला मात दिली. सोफी म्हणाली की, 'निसर्ग सुंदर आहे आणि आपण त्याची देखभाल करण्याची गरज आहे. पण तुमच्या चुकीने काहीही होऊ शकतं'.