संतापजनक! मृत्यू झाल्याचं सिद्ध करण्यासाठी इन्शुरन्स ऑफिसमध्येच घेऊन जावा लागला व्यक्तीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:08 PM2019-11-22T12:08:55+5:302019-11-22T12:17:34+5:30
लाइफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा. आपल्यानंतर आपल्या परिवाराला आयुष्यभर काहीतरी आधार मिळावा म्हणून अनेकजण या विम्यासाठी पैसे भरतात.
लाइफ इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा. आपल्यानंतर आपल्या परिवाराला आयुष्यभर काहीतरी आधार मिळावा म्हणून अनेकजण या विम्यासाठी पैसे भरतात. पण अनेकदा अशा घटना समोर येतात की, विमा कंपन्यांकडून पैसे मिळवण्यासाठी अनेकांना कितीतरी फेऱ्या मारव्या लागतात. पण पैसे काही मिळत नाही. कधी कधी तर कंपन्या असे काही नियम समोर आणतात की, परिवारातील लोक निराश होऊ कंपन्यांचा पिच्छा सोडतात. अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ही धक्कादायक घटना दक्षिण आफ्रिकेतील आहे. इथे एका परिवारातील लोक मृत व्यक्तीला घेऊन इन्शुरन्स ऑफिसमध्ये पोहचले. कारण इन्शुरन्स कंपनीतील लोक हे मानायला तयार नव्हते की, त्या व्यक्तीचं निधन झालंय. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.
[EXPOSE OLD MUTUAL] Family bring their dead family member after @OldMutualSA refused to pay their policy benefit. Old Mutual’s arrogance is stinking now. What a shame! May the soul of the poor person Rest In Peace. Plz Retweet. pic.twitter.com/Gk2QFQWkoM
— White Man Confession (@ConfessionWhite) November 19, 2019
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार,४६ वर्षीय सिफिसो जस्टिस म्हेल्गो यांचं निधन ७ नोव्हेंबरला झालं होतं. जेव्हा त्यांचे नातेवाईक इन्शुरन्स कंपनीत विम्याची रक्कम मागण्यासाठी गेले, तेव्हा कंपनीने नकार दिला. कंपनीला यावर विश्वास नव्हता की, सिफिसो यांचा मृत्यू झालाय. मग परिवारातील लोक हे सिद्द करण्यासाठी थेट मृतहेदच तिथे घेऊन गेले.
या घटनेची चर्चा आता सोशल मीडियात होत असून कंपनीच्या वागण्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. आता सांगितले जात आहे की, इन्शुरन्स कंपनीकडून ९ दिवस टोलवा-टोलवीची उत्तरे दिली गेली. याचा अर्थ या परिवाराला व्यक्तीचा मृतदेह ९ दिवस सोबत ठेवावा लागला. हे फारच अमानवीय असून यावर जोरदार टिका होत आहे.
वातावरण तापत असल्याचं दिसत असल्याने कंपनीकडून एक स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलं. या त्यांनी सांगितलं की, 'ही फारच दु:खद घटना आहे. आम्ही या कठिण काळात परिवाराबाबत सहानुभूति व्यक्ती करतो. त्या परिवाराला विम्याची रक्कम मिळाली आहे'.