McDonald आउटलेटमध्ये जन्माला आलं बाळ, लॉबीमध्येच झाली डिलिव्हरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:34 PM2019-04-05T16:34:10+5:302019-04-05T16:41:02+5:30

McDonald च्या आउटलेटमध्येच त्या महिलेने बाळाला जन्म दिला.

Shocking McDonald delivery restaurant lobby turns into delivery room | McDonald आउटलेटमध्ये जन्माला आलं बाळ, लॉबीमध्येच झाली डिलिव्हरी

McDonald आउटलेटमध्ये जन्माला आलं बाळ, लॉबीमध्येच झाली डिलिव्हरी

googlenewsNext

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची घटना आहे. एक महिला McDonald च्या आउटलेटमध्ये गेली. ती गर्भवती होती. पण अचानक तिला प्रसूतीकळा होऊ लागल्या. इतक्या की, तिला हॉस्पिटलला घेऊन जाण्याचाही वेळ नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी McDonald च्या त्याच आउटलेटला हॉस्पिटल केलं. McDonald च्या आउटलेटमध्येच त्या महिलेने बाळाला जन्म दिला.

City of Madera Police Department ने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, 'असं फार कमी होतं की, एखाद्या बाळाचा जन्म McDonald मध्ये होतो. काल रात्री तसं झालं. ऑफिसर्स रुग्णवाहिका घेऊन तिथे पोहोचले. McDonald च्या लॉबीलाच त्यांनी हॉस्पिटल केलं. बाळ आणि त्याची आई दोघेही सुरक्षित आहेत. नंतर दोघांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं'.

Web Title: Shocking McDonald delivery restaurant lobby turns into delivery room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.