Shocking! Netflix च्या सीरीजमधून 2 वर्षांआधीच कोरोनाचा केला होता खुलासा, व्हिडीओ पाहून बसेल धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:06 PM2020-03-27T12:06:44+5:302020-03-27T12:07:58+5:30
My Secret Terrius ही 2018 मध्ये आलेली सीरीज त्या काही सीरीजपैकी आहे ज्यात कोरोनाचा उल्लेख आधीच करण्यात आला होता.
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. हजारो लोकांचा रोज जीव जातो आहे. चीनमधून पसरलेल्या या व्हायरसने जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांना शिकार केलं आहे. अजूनही लोकांना कोरोना व्हायरसबाबत अनेक प्रश्न पडतात आणि शंका निर्माण होतात. बोलता बोलता लोक चीनवरही संशय घेतात. अशात कोरोना व्हायरसबाबत लोक ट्विटरवर आश्चर्यकारक चर्चा करू लागले आहेत. लोकांना प्रश्न पडला आहे की, या कोरोना व्हायरसबाबत कसा नेटफ्लिक्सच्या एका सीरीजमध्ये इशारा देण्यात आला होता?
My Secret Terrius ही 2018 मध्ये आलेली सीरीज त्या काही सीरीजपैकी आहे ज्यात कोरोनाचा उल्लेख आधीच करण्यात आला होता. सप्टेंबर 2018 मध्ये नेटफ्लिक्सवर या सीरीजबाबत चर्चा झाली. यात कोरियाचा अभिनेता सो जी-सबने एका सीक्रेट एजन्टची भूमिका साकारली आहे.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, 2018 मध्ये या सीरीजच्या 10व्या एपिसोडमध्ये दाखण्यात आलं आहे की, कशाप्रकारे मनुष्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या व्हायरसबाबत इशारा देण्यात आला आहे. यात एक डॉक्टर सांगते की, कुणीतरी कोरोना व्हायरसला मोर्टेलिटी रेट 90 टक्क्यांपर्यंत वाढण्यासाठी तयार केलं आहे. तसेच यात डॉक्टर असंही सांगताना दिसत आहे की, काही लोक या व्हायरसचा वापर बायोलॉजिकल हत्यार म्हणून करणार होते आणि याचा प्रभाव होण्यासाठी 2 ते 14 दिवस लागतात.
तसेच यात सांगण्यात आले आहे की, केवळ 5 मिनिटांच्या एक्सपोजरमुळेही व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर अटॅक करतो. खास बाब ही आहे की, यातील डॉक्टर सांगते की, व्हायरसपासून बचावासाठी कोणतंही औषध नाही. हे सगळं पाहून पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की, असा कसा 2018 मधील एका सीरीजमध्ये कोरोनाबाबत इशारा देण्यात आला.
कोरोना व्हायरसबाबत केवळ या सीरीजमध्येच नाही तर 'कंटेजियन' सिनेमातही उल्लेख आढळतो. त्यातही या जीवघेण्या आजाराबाबत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे हा आजार जगभरात पसरतो आणि लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो.