धक्कादायक! कपाळावर ‘चोर’ लिहिले; मुलीने शाळेच्या ३ ऱ्या मजल्यावरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 06:58 AM2023-09-25T06:58:44+5:302023-09-25T06:59:13+5:30

शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलीवर उपचार केले जाणार नाहीत

Shocking! 'Thief' was written on the girl's forehead; she | धक्कादायक! कपाळावर ‘चोर’ लिहिले; मुलीने शाळेच्या ३ ऱ्या मजल्यावरुन मारली उडी

धक्कादायक! कपाळावर ‘चोर’ लिहिले; मुलीने शाळेच्या ३ ऱ्या मजल्यावरुन मारली उडी

googlenewsNext

पंजाबमधील लुधियाना येथील एका खासगी शाळेत एका विद्यार्थिनीच्या कपाळावर आणि हातावर ‘चोर’ असे लिहून तिला परिसरात फेरी मारायला लावल्यामुळे दुखावलेल्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या पाठीचा कणा तुटला असून आठवडाभरापासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शाळेच्या व्यवस्थापनाने याबाबत कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलीवर उपचार केले जाणार नाहीत, अशा धमक्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाने या घटनेची माहिती कोणालाच दिली नाही. विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक आहे, याची माहिती मिळताच काँग्रेस नेते सुशील कपूर लकी आणि गुरजित सिंग यांनी शाळेबाहेर धरणे आंदोलन केले. यानंतर डाबा ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांकडे कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. एसएचओ कुलबीर सिंह म्हणाले की, तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल.

कठोर शिक्षा...
पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे. ही विद्यार्थिनी तिची वही घरीच विसरली होती. शिक्षिकेने तिला वही आणण्यासाठी घरी पाठवले असता एका विद्यार्थिनीने मागून एक वही तिच्या बॅगेत ठेवली आणि तिच्यावर वही चोरीचा आळ घेतला. विद्यार्थिनीला मुख्याध्यापकांकडे नेण्यात आले. झडती घेतली असता तिच्या बॅगेतून वही सापडली. मुख्याध्यापकांनी कोणतीही दयामाया न करता विद्यार्थिनीच्या कपाळावर आणि हातावर ‘चोर’ लिहून तिला शाळेच्या आवारात फेरी मारायला लावली.

Web Title: Shocking! 'Thief' was written on the girl's forehead; she

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.