VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 04:32 PM2022-08-04T16:32:48+5:302022-08-04T16:34:45+5:30

खरे तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बस नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. यावेळी जेव्हा बस एका वाघाजवळ थांबते तेव्हा एक व्यक्ती आपल्यापासून दूर असलेल्या एका वाघाला मांसाचा तुकडा दाखवून बोलावताना दिसत आहे.

shocking video a man opened the bus window to feed a tiger see what happened next | VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल

VIDEO: वाघाला काही खायला देण्यासाठी माणसानं उघडली बसची खिडकी, मग जे झालं ते पाहून तुमचा थरकाप उडेल

googlenewsNext

इंटरनेट जगतात सातत्याने नवनवे व्हिडिओ बघायला मिळतात. यातील काही व्हिडिओ गमतीशीर असतात, तर काही व्हिडिओ धक्कादायकही असतात. यांपैकी प्राण्यांशी संबंधित व्हिडिओदेखील लोकांना खूप आवडतात. मात्र सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने सर्वांच्याच थरकाप उडवणारा आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बसची खिडकी उघडून वाघाला निमंत्रण देताना दिसत आहे. व्हिडिओतील या व्यक्तीचे हे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. 

खरे तर, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक बस नॅशनल पार्कमध्ये दिसत आहे. यावेळी जेव्हा बस एका वाघाजवळ थांबते तेव्हा एक व्यक्ती आपल्यापासून दूर असलेल्या एका वाघाला मांसाचा तुकडा दाखवून बोलावताना दिसत आहे. यानंतर वाघ, हा मांसाचा तुकडा पाहून गाडी जवळ येतो आणि त्या छोट्याशा स्टिकला लावलेला मांसाचा तुकडा झटकन खाऊन टाकतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून तो आतापर्यंत 27 हजारहून अधिक लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओपाहून अवाक झालेले युजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बस चालकाचे हे कृत्य एखादवेळा त्याच्या जीवावरही बेतू शकते, असे काही लोकांचे म्हणणे आहे. याचवेळी अनेक यूजर्सनी ड्रायव्हरला मूर्खही म्हटले आहे. 

Web Title: shocking video a man opened the bus window to feed a tiger see what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.