Shocking Video! हवेत उडत आला ऑटो ड्रायव्हर, रस्त्याने जात असलेल्या महिलेला पडले तब्बल ५२ टाके....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 05:15 PM2020-07-31T17:15:08+5:302020-07-31T17:15:16+5:30
बघितलं जाऊ शकतं की, बंगळुरूतील टीसी पाल्या रोडवर वीजेची एक तार झुलत होती. ही तार इतकी सैल आहे की, हवेत उडत रस्त्यावर पडत आहे.
बंगळुरूमध्ये एक महिला रस्त्याने जात होती. अचानक एक व्यक्ती मागून हवेत उडत येतो आणि इतकी जोरात धडक मारतो की महिला खाली पडते. या विचित्र दुर्घटनेत महिलेला तब्बल ५२ टाके पडले आहेत. आता सोशल मीडियावर या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.
बघितलं जाऊ शकतं की, बंगळुरूतील टीसी पाल्या रोडवर वीजेची एक तार झुलत होती. ही तार इतकी सैल आहे की, हवेत उडत रस्त्यावर पडत आहे. अचानक ही तार ऑटोच्या चाकात अडकते. ऑटो ड्रायव्हर ती तार काढण्याचा प्रयत्न करतो. अशात एका दुसऱ्या वाहनात तार गुंतते आणि तार खेचली जाते. यात रस्त्यावरील ऑटोचा ड्रायव्हर अडकतो आणि हवेत फेकला जातो.
#ICYMI: Unbelievable! Auto driver comes flying like Anjaneya and crashes into woman; video goes viral.
— Bangalore Mirror (@BangaloreMirror) July 31, 2020
Read more: https://t.co/gjTsg0lmCapic.twitter.com/WTREwZNkgY
ड्रायव्हर तारेने इतका दूर फेकला जातो की, रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेवर जाऊन पडतो. या महिलेचं नाव सुनिता आहे. रिपोर्टनुसार, ही घटना १६ जुलै सकाळी साडे अकरा वाजताची आहे. त्यावेळी ही महिला हॉटेल अन्नपूर्णेश्वरीकडे जात होती.
या महिलेने मुंबई मिररला सांगितले की, कुणीतरी माझं नाव घेतलं. मी मागे पाहिलं तर दिसलं की एक ऑटो ड्रायव्हर माझ्या दिशेने उडत येत आहे. त्याने मला धडक दिली आणि जमिनीवर पडले. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. मी तिथेत मदतीसाठी वाट पाहत बसले. जवळच सुनीताचे पती काम करत होते. ते आले आणि त्यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. महिलेच्या डोक्याला ५२ टाके आलेत.
हे पण वाचा :
ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही
बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...
तुम्ही पाहिलं का? अवकाशात सूर्य उगवताना 'असा' दिसला; NASA नं क्लिक केलं जबरदस्त दृश्य