LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 09:58 PM2022-09-14T21:58:28+5:302022-09-14T21:59:47+5:30

मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद

Shoutout in LIVE match as Fans protest cancellation of matches due to death of Queen Elizabeth second | LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

LIVE मॅचमध्ये राडा! 'क्वीन'च्या निधनामुळे सामने रद्द केल्याचा फॅन्सकडून निषेध

Next

Queen Elizabeth: मंगळवारी चॅम्पियन्स लीगमध्ये बराच गदारोळ झाला. मैदानातील खेळापासून चाहत्यांच्या वागणुकीपर्यंत बरेच वाद झाले. फ्रँकफर्टमधील मार्सेली आणि इनट्रॅच फ्रँकफर्ट यांच्यातील सामन्यात चाहत्यांनी येथे नाझी सॅल्यूट करण्यास सुरुवात केल्याने वाद झाला आणि त्यानंतर स्टँडवरील परिस्थिती अनियंत्रित झाली. तसेच, जर्मनीतील बायर्न म्युनिक-बार्सिलोना सामन्यादरम्यान काही चाहत्यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे रद्द झालेल्या सामन्यांचा निषेध केला. चाहते मोठमोठे बॅनर घेऊन येथे पोहोचले होते. त्यावर लिहिले होते की, रॉयल माणसांच्या मृत्यूमुळे सामने रद्द करू नयेत.

फ्रँकफर्टमधील मार्सेली आणि इनट्रॅच फ्रँकफर्ट यांच्यातील सामन्यात स्टँडवरून चाहत्यांनी हुल्लडबाजी केली आणि नाझी सलामी दिली. यावेळी काही चाहत्यांनी इनट्रॅच फ्रँकफर्ट क्लबचे कपडे घातलेले दिसले, त्यानंतर क्लबने माफी मागितली आणि स्पष्टीकरण दिले. क्लबचे म्हणणे आहे की ते अशा चाहत्यांना पाठिंबा देत नाहीत आणि या प्रकरणी ते कायदेशीर कारवाईला पूर्ण पाठिंबा देतात. चॅम्पियन्स लीग दरम्यान अलीकडच्या काही सामन्यांमध्ये अशा प्रकारचा निषेध दिसला होता, त्यानंतर बराच गदारोळ झाला होता.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतरही ब्रिटनमधील क्रीडा स्पर्धा एक दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली होती. याशिवाय युरोपातील काही देशांनीही आदरांजली वाहिली होती. तथापि, नंतर इंग्लंड सरकारकडून असे आवाहन करण्यात आले की, खेळाडूंना केवळ काळ्या हातपट्ट्या घालून शोक व्यक्त करता येईल. मात्र फॅन्सना यातील काही गोष्टी रूचल्या नाहीत.

Web Title: Shoutout in LIVE match as Fans protest cancellation of matches due to death of Queen Elizabeth second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.