सारा तेंडुलकर शुभमन गिलची बायको; (सचिनसाठी) गुगलचा 'जावई'शोध
By कुणाल गवाणकर | Published: October 15, 2020 09:37 AM2020-10-15T09:37:34+5:302020-10-15T09:43:16+5:30
Sara Tendulkar Shubman Gills Wife: 'शुभमन गिलची बायको' सर्च केल्यावर गुगल म्हणतं 'सारा तेंडुलकर'
दुबई: आयपीएलचा (Indian Premier League) तेरावा हंगाम मैदानासोबत मैदानाबाहेर गाजत आहे. कोरोना संकटामुळे आयपीएल स्पर्धा दुबईत खेळवण्यात येत असली तरीही क्रिकेट चाहत्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाही. सोशल मीडियावरही आयपीएलची जोरदार चर्चा आहे. आयपीएलमधील संघ, खेळाडू, त्यांची कामगिरी, मैदानाबाहेरचे किस्से यांचे मिम्स व्हायरल होत आहेत. हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानची बायको सर्च केल्यावर गुगल अनुष्का शर्माचं नाव दाखवत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वीच झाली. आता अशाच कारणामुळे युवा क्रिकेटपटू शुभमन गिल चर्चेत आला आहे.
शुभगन गिलची बायको असं सर्च केल्यावर गुगलकडून सारा तेंडुलकर असं उत्तर मिळतं. सारा ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या आहे. तर शुभमन सध्या कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करतो. शुभमन गिल २१ वर्षांचा आहे. त्याचं लग्न झालेलं नाही. पण मग 'शुभगन गिल वाईफ' सर्च केल्यावर साराचं नाव समोर का येतं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचं उत्तर काही दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रसंगात आहे.
शुभमन साराचा प्रियकर असल्याची चर्चा याआधीही अनेकदा झाली. काही दिवसांपूर्वी शुभमननं इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. नवी कार खरेदी केल्यानंतरचा हा फोटो होता. त्यावर सारानं अभिनंदनाची कमेंट केली होती. त्या कमेंटपुढे काळ्या रंगाचं हार्ट होतं. शुभमननंही हार्ट इमोजी वापरून साराचे आभार मानले. ही बाब क्रिकेटपटू हार्दिक पांड्यांच्या लक्षात आली. त्यानं शुभमनची थट्टा करण्यासाठी लगेच कमेंट केली. 'तिच्याकडूनही तुझे खूप खूप आभार' अशी कमेंट हार्दिकनं केली. त्यानंतर शुभमन आणि साराचं नाव अनेकदा एकत्र चर्चेत आलं.
२९ जुलैला सारानं तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तर शुभमन गिलनं त्याच दिवशी स्वत:चा एक फोटो ट्विट केला. दोन्ही फोटोचं शिर्षक एकच (आय स्पाय) होतं. याचीही बरीच चर्चा झाली. अनेकांनी फोटोखाली कमेंट करून याकडे लक्ष वेधलं होतं. दोनच दिवसांपूर्वी (१२ ऑक्टोबर) साराचा वाढदिवस होता. त्या दिवशी केकेआरचा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होता. या सामन्यात शुभमननं चांगली सुरुवात केली. मात्र तो ३४ धावांवर बाद झाला. याचीही सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.