अरे बापरे! कंपनीचं अजब फर्मान, खराब कामगिरीवर कर्मचारी एकमेकांना थप्पड मारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 03:38 PM2023-03-29T15:38:49+5:302023-03-29T15:39:26+5:30
या घटनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामाही दिला.
एखाद्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोटीव्हेट करण्यासाठी कंपनी वेगवेळ्या योजना राबवित असते. यात चांगला परफॉर्मन्स करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बक्षीस दिले जाते, तर कुठे टुरसाठी बुकिंग दिले जाते. पण, सध्या एका कंपनीतील फर्मान चर्चेत आले आहे. एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या परफॉर्मन्स न करणाऱ्या कर्मचाऱ्याला कर्मचाऱ्यानीच एकमेकांना थप्पड मारण्याचे फर्मान काढले आहे, यावरुन आता कंपनीवर आरोप सुरू झाले आहेत.
कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी कंपन्या विविध कसरती करत असतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की एका कंपनीने ऑफिसमध्ये चीअरलीडर्स ठेवल्या आहेत जेणेकरून ते कर्मचाऱ्यांचे मनोरंजन करू शकतील. त्यांना प्रेरित करु शकतील. तर एका कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना स्लीप डेला झोपण्यासाठी सुट्टी दिली. पण, आता हाँगकाँगच्या कंपनीचे हे फर्मान केले आहे. खराब कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना थप्पड मारावी लागणार आहे.
Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video
ही बातमी एका विमा कंपनीची आहे. कर्मचाऱ्यांनी फेसबुकवर पोस्टर शेअर करून आपलं दुख: सांगितलं आहे. कंपनीचे वार्षिक फंक्शन ठेवण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रात्रीचे जेवण चालू होते. त्यानंतर विमा कंपनीचे बॉस स्टेजवर आले आणि त्यांनी कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. आणि एकमेकांच्या गालावर थप्पड मारली. कर्मचाऱ्यांना हे वर्तन अपमानास्पद वाटले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
ही बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली. यावर जगभरातून टीका झाली. नेटकऱ्यांनी याला हिंसक वर्तन म्हटले आणि अशा कंपनीवर तात्काळ बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली.
या घटनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी राजीनामाही दिला. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेकांनी आपण असा विचार करत असल्याचे सांगितले. त्यावरून एका संतप्त व्यक्तीने सांगितले की, ही कंपनी इतकी निर्दयी आहे की ती आपल्या कर्मचाऱ्यांशी खेळण्यांप्रमाणे खेळते. इतरांना या खुलाशांमुळे इतका राग आला की त्यांनी राजीनामा देण्यास उद्युक्त करण्यापूर्वी कंपनीने हाँगकाँगच्या कामगार विभागाला कळवायला हवे होते, असंही म्हटले आहे.