'दिल का दरिया'...अरिजित सिंगच्या गाण्याची श्वानालाही भुरळ; व्हायरल Video पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 11:25 AM2023-12-07T11:25:49+5:302023-12-07T11:26:54+5:30

कबीर सिंग या चित्रपटातील 'दिल का दरिया' हे गाणे लागताच श्वान झोपेतून उठला,  व्हिडीओ होतोय व्हायरल. 

Sleeping Dog reaction after listning arijit singh movie kabir singh song video goes viral on social media  | 'दिल का दरिया'...अरिजित सिंगच्या गाण्याची श्वानालाही भुरळ; व्हायरल Video पाहाच!

'दिल का दरिया'...अरिजित सिंगच्या गाण्याची श्वानालाही भुरळ; व्हायरल Video पाहाच!

Viral Video : हल्ली सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच सोशल मीडियावर दिवसेंदिवस नानाविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूमाकूळ घालतोय. या व्हिडीओवर ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. 

खरंतर आजवर बॉलिवूड इंडस्ट्रीने प्रेक्षकांना सुप्रसिद्ध चित्रपटांसह सुरेल संगिताची मेजवाणी दिली आहे. त्यातील काही गाणी प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम घर करून आहेत आणि अरिजित सिंगने गायलेली गाणी म्हणजेच प्रत्येकाच्या भावनांना वाव देणारी आहेत, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. अरिजित सिंगने गायलेल्या गाण्यावर माणसं व्यक्त होताना आपण पाहिली असतीलच. पण एखादा श्वान अरिजितच्या गाण्यावर व्यक्त होतोय हे पाहून तुम्हाला नवलं वाटेल. 

त्यामुळे माणसांना आवडणाऱ्या गाण्यांची भाषा प्राण्यांना देखील कळत असेल का? याबाबत संभ्रम आहेच. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा श्वान चक्क अरिजित सिंगचे गाणे वाजताच सोफ्यावर उठून बसतो आणि जोरजोरात भुंकू लागतो. इतकंच नाही तर चक्क या गाण्यावर हा श्वान व्यक्त होताना दिसतोय. त्यामुळे नेटकरी चकीत झाले आहेत. 

इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
शिवाय या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे गाणे ऐकून या श्वानाचा मालक रडत असेल अशी मजेशीर कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.

येथे पाहा व्हिडीओ :

Web Title: Sleeping Dog reaction after listning arijit singh movie kabir singh song video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.