पार्थिवाभोवती कुटुंबातील ४ पिढ्या जमल्या, हसत हसत फोटो काढला; कारण ऐकलं तर नवल वाटेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:44 PM2022-08-24T20:44:34+5:302022-08-24T20:45:20+5:30

९५ वर्षीय मरियम्मा वर्गीसच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या आधीचा हा फोटो आहे. काही लोकांनी हे संवेदनशून्य असल्याचं म्हटलं

Smiling Faces And Selfies Of Four Generations At The Funeral In Kerala | पार्थिवाभोवती कुटुंबातील ४ पिढ्या जमल्या, हसत हसत फोटो काढला; कारण ऐकलं तर नवल वाटेल 

पार्थिवाभोवती कुटुंबातील ४ पिढ्या जमल्या, हसत हसत फोटो काढला; कारण ऐकलं तर नवल वाटेल 

Next

कोट्टायम - एखाद्या घरातील व्यक्तीचं निधन झाले तर अख्ख्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. अनेकांच्या डोळ्यात अश्रू येतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात घरात पार्थिव ठेऊन कुटुंबातील जवळपास ४ पिढ्यातील सर्वच जण हसत फोटो काढत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. 

९५ वर्षीय आईच्या पार्थिवाभोवती जमलेल्या कुटुंबातील चार पिढ्यांच्या फोटोवर नेटिझन्सनं संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एखाद्याच्या दु:खाच्या क्षणी तुम्हाला हसू येणार नाही अशा प्रतिक्रिया दिसून येत आहेत. गेल्या शुक्रवारी क्लिक केलेला फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मल्लाप्पल्ली, पठानमथिट्टा येथील पनवेलिल कुटुंबातील फोटोत पूर्णपणे वेगळी आणि प्रेरणादायी कहाणी आहे. 

९५ वर्षीय मरियम्मा वर्गीसच्या निधनानंतर अंत्यसंस्काराच्या आधीचा हा फोटो आहे. काही लोकांनी हे संवेदनशून्य असल्याचं म्हटलं. हे कुटुंब पतनमतिट्टामध्ये राहतं. मरियम्माच्या मृत्यूनंतर सर्वांना दु:ख झाले परंतु सर्वांनी तिच्या आयुष्याचा आनंद व्यक्त केला. आमचं कुटुंब सोशल मीडियावरील रिएक्शन पाहत होतो. परंतु त्याला प्रत्युत्तर देणे गरजेचे वाटलं नाही असं मरियम्मा यांचे मोठे चिरंजीव जॉर्ज यांनी सांगितले. 

त्याचसोबत मरियम्मा यांच्या जाण्याचं आम्हाला खूप दु:ख झाले. परंतु तिचा आमच्या जीवनावर असलेला प्रभाव आम्ही साजरा करत आहोत. संपूर्ण कुटुंब एकाचं आयुष्य साजरं करत होतं. आम्हा सर्वांच्या मनात तिच्याशी संबंधित खूप आनंदी आठवणी होत्या. आम्ही त्या गोष्टी शेअर केल्या आणि देवाचे आभार मानले आणि मग फोटो काढला असं जॉर्ज यांनी म्हटलं. 

बराच काळ आजारी होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मरियम्मा वर्गीस या सुमारे दीड वर्षांपासून अंथरुणाला खिळल्या होत्या आणि गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मरियमाला ९ मुले आणि १९ नातवंडे आहेत जी जगातील अनेक देशांमध्ये राहतात. जॉर्ज ओमेन यांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांच्यावर अशाच प्रकारे अंत्यसंस्कार करण्यात आले. मरियम्मा यांच्या कुटुंबीयांनीही त्यांचे जीवन खूप प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संपूर्ण कुटुंब एकत्र होते आणि सर्वांनी हसत हसत कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Smiling Faces And Selfies Of Four Generations At The Funeral In Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.