बाबो! साबणात सापडलं तब्बल ३८ लाखाचं सोनं, लोकांना आठवली गोल्ड क्वाइनची जाहिरात....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 09:21 AM2020-09-05T09:21:33+5:302020-09-05T09:22:26+5:30

सोने तस्करीची एक घटना समोर आली आहे. ट्विटर यूजर @FaiHaider ने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, '३८ लाखाचं साबण तिरूचिरापल्ली एअरपोर्टवर जप्त करण्यात आलंय'.

Smuggler hides gold worth 38 lakh in soap bars viral video | बाबो! साबणात सापडलं तब्बल ३८ लाखाचं सोनं, लोकांना आठवली गोल्ड क्वाइनची जाहिरात....

बाबो! साबणात सापडलं तब्बल ३८ लाखाचं सोनं, लोकांना आठवली गोल्ड क्वाइनची जाहिरात....

googlenewsNext

तस्करांचं डोकं कितीही सुपरफास्ट असलं तरी त्यांना याची कल्पना नसते की, पोलीस किती चतुर असतात. तस्कर लोक वेगवेगळ्या आयडिया लावून तस्करी करत असतात. पण अखेर पकडले जातातच. अशी एक घटना आंध्र प्रदेशातून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दोन व्यक्ती दारूच्या १०१ बॉटल्स शरीरावर चिकटवून बाइकने तेलंगाणाला जात होते. पण पोलिसांनी त्यांचा प्लॅन हाणून पाडला. आता सोने तस्करीची एक घटना समोर आली आहे. ट्विटर यूजर @FaiHaider ने या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, '३८ लाखाचं साबण तिरूचिरापल्ली एअरपोर्टवर जप्त करण्यात आलंय'.

या व्हिडीओत बघता येऊ शकतं की, तस्करांनी मोठ्या सफाईदारपणे एका प्रसिद्ध ब्रॅन्डच्या साबणात सोनं लपवलं होतं. पण एअरपोर्ट सुरक्षा विभागाने या जप्त केल्या. नंतर जेव्हा साबण चेक केल्या तर त्यात तब्बल ३८ लाख रूपयांचं सोनं आढळून आलं. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून लोक यावर मजेदार कमेंटही करत आहेत.

या व्हिडीओवर लोक अनेक मजेदार कमेंट कररत आहेत. काहींनी लिहिले की, या साबण कंपनीची जाहिरात खरी ठरली, ज्यात ते साबणात गोल्ड क्वाइन मिळणार असा दावा करत होते. त्यामुळे या साबण कंपनीचा खपही अधिक होत होता. तुम्हाला आठवते ना या कंपनीची गोल्ड क्वाइनची स्कीम?

हे पण पाहा :

शाब्बास पोरा! १० वी च्या पोरानं भंगारापासून बनवली भन्नाट बाईक; नेटिझन्सना आठवलं पबजी....

वाह रे पठ्ठ्या! लॉकडाऊनमुळे गावाची वाट धरली; अन् ३ महिन्यात दीड लाखाची कमाई केली

अरे बापरे... विमानतळावर दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल WWF; व्हिडीओ व्हायरल

Web Title: Smuggler hides gold worth 38 lakh in soap bars viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.