VIDEO : जंगलात खतरनाक सापाने व्यक्तीवर केला हल्ला, बघूनच उडेल थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 06:47 PM2022-02-16T18:47:53+5:302022-02-16T18:51:17+5:30
Snake Viral Video : जगभरात वेगवेगळ्या सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. काही साप हे विषारी असतात तर काही साप विषारी नसतात. त्यामुळे सापांपासून दूर राहिलेलंच बरं असतं.
Snake Viral Video : जंगलात सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात. तुम्ही कधी जंगलात फिरायला गेलात तर ते वाटेत कुठे ना कुठे दिसतातच. यातील काही जीव हे शांतपणे आपल्या मार्गाने निघून जातात, पण काही जीव फारच खतरनाक असतात. या जीवांपासून दूर राहण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. तसं केलं नाही तर जीवही गमवावा लागू शकतो. जंगलातील सर्वात खतरनाक जीव म्हणून वाघ, सिंह, बिबट्या यांकडे पाहिलं जातं. त्यात साप आणि विंचवांचाही समावेश आहे.
जगभरात वेगवेगळ्या सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. काही साप हे विषारी असतात तर काही साप विषारी नसतात. त्यामुळे सापांपासून दूर राहिलेलंच बरं असतं. अनेकांना तर दुरूनही साप तरी घाम फुटतो. पण काही लोक हिरोगिरी करत सापांजवळ जातात आणि आपला जीव धोक्यात टाकतात. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे मनुष्य जेवढा सापांना घाबरतो त्यापेक्षा जास्त साप मनुष्यांना घाबरतात. कधी कधी लोकांना त्यांच्या हल्ल्याचाही सामना करावा लागतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एका खतरनाक सापाने जंगलात एका व्यक्तीवर हल्ला केला आणि त्याला दंश मारण्याचा प्रयत्न केला. सापाने हे केवळ एक नाही तर दोन तीन वेळा केलं. एका व्यक्ती जंगलात फोटोग्राफी करत होता. तो सापाचे फोटो काढत होता. पण तेव्हाच अचानक सापाने त्याच्यावर हल्ला केला आणि फोटोग्राफर तेथून पळाला. जर तो मागे सरकला नसता तर त्याचा जीवही गेला असता.
हा व्हिडीओ fique.off नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला. आतापर्यंत या व्हिडीओला ५ लाख ६३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६ हजारांपेक्षा जास्त लाइक मिळाले आहेत. तसेच लोक यावर अनेक कमेंट्सही करत आहेत. अनेकजण म्हणाले की, याच कारणाने सापांपासून दूर रहायला हवं.