Video - बापरे! जो साप चावला त्यालाच घेऊन 'तो' रुग्णालयात गेला अन् झालं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 01:58 PM2024-08-25T13:58:32+5:302024-08-25T14:01:08+5:30
एका तरुणाला विषारी किंग कोब्रा सापाने चावा घेतला. यानंतर या तरुणाने लगेचच विषारी किंग कोब्रा सापाला पकडलं आणि एका डब्यात सापाला घेऊन रुग्णालयात पोहोचला.
सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून लोक आश्चर्यचकित होतात. असाच एक व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला साप चावलेला पाहायला मिळत आहे, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही व्यक्ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्याच्यासोबत त्याला चावणारा सापही आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे प्रकरण लखीमपूरच्या संपूर्णानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाला विषारी किंग कोब्रा सापाने चावा घेतला. यानंतर या तरुणाने लगेचच विषारी किंग कोब्रा सापाला पकडलं आणि एका डब्यात सापाला घेऊन रुग्णालयात पोहोचला. रुग्णालयात गेल्यावर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सापाला असं का घेऊन आला आहे हे सुरुवातीला कोणालाच समजलं नाही.
अरे पंडित जी छा गए....
— अतुल श्रीवास्तव (@AtulShri92) August 24, 2024
यूपी के लखीमपुरखीरी में हरि स्वरूप मिश्रा को कोबरा ने काटा और वो सांप को डिब्बे में बंद करके इलाज करने अस्पताल पहुंच गए. pic.twitter.com/w2axtoYNfu
रुग्णालयात गोंधळ सुरू असताना कर्मचाऱ्यांनी त्याला काय चाललं आहे असं विचारलं असता, त्याने तो सर्पमित्र असल्याचं उत्तर दिलं. हरि स्वरूप मिश्रा असं त्याचं नाव असून त्याला या विषारी किंग कोब्राने चावा घेतला आहे. त्यामुळेच त्याने जो साप चावला तो सापही सोबत आणला आहे. हे उत्तर ऐकून रुग्णालयातील कर्मचारी हसले आणि त्याला म्हणाले की, तुम्ही ग्रेट आहात.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर के वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरी स्वरूप मिश्रा यांची प्रकृती सध्या बरी आहे. त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. जेव्हा जेव्हा साप चावतो तेव्हा अंधश्रद्धेला बळी पडू नये, असंही त्यांनी सांगितलं. लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्या. सापाच्या विषाचा सामना करण्यासाठी अँटी स्नेक इंजेक्शन असतं.