Viral Video : 'त्याच्या' तळहातावरील पाणी पित होता साप, अनोखा व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 02:33 PM2020-06-20T14:33:25+5:302020-06-20T14:37:56+5:30

सोशल मीडियात तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा नक्की पाहिला नसेल. हीच या व्हिडीओची खासियत आहे.

Snake drinking water from humans palm video goes viral | Viral Video : 'त्याच्या' तळहातावरील पाणी पित होता साप, अनोखा व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्...

Viral Video : 'त्याच्या' तळहातावरील पाणी पित होता साप, अनोखा व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्...

googlenewsNext

कधी कधी सोशल मीडियात असे व्हिडीओज व्हायरल होता जे बघून आश्चर्याचा धक्का तर बसतोच सोबतच असे व्हिडीओ आपण पुन्हा पुन्हा बघतो. असाच एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एक साप एका व्यक्तीच्या तळहातावर घेतलेलं पाणी पिताना दिसत आहे. 

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांता नंदा यांनी हा सापाचा अनोखा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, हा साप तोंड आधी पाण्यात बुडवतो नंतर पाणी पितो. व्हिडीओत तुम्ही स्पष्टपणे बघू शकता की, एक बारीक हिरव्या रंगाचा साप शांतपणे एका व्यक्तीच्या हातावर असलेलं पाणी पितो आहे. तो थोडं तोंड उघडून पाणी आत ओढतो आहे. 

सोशल मीडियात तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. पण असा नक्की पाहिला नसेल. हीच या व्हिडीओची खासियत आहे. काही लोक या व्हिडीओवर टीका करत आहेत तर काही लोक क्यूट म्हणत आहेत. तर काही लोक या सापाबाबतची माहिती विचारत आहेत. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. तर अनेकजण सापाबाबत चर्चाही करत आहेत. 

याआधीही काही सापांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते ज्यात एक व्यक्ती कोब्रा सापाला बॉटलने पाणी पाजताना दिसत आहे. हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झालाय. तर दुसऱ्या एका व्हिडीओत एक व्यक्ती उन्हाने वैतागलेल्या कोब्रा सापाची आंघोळ घालताना दिसत आहे.

पाण्याचा थेंब मुंग्यांची तहान कसा भागवतो हे दाखवणारा अद्भूत क्षण, मुंग्यांचं हे जगणं तुम्ही याआधी कधी पाहिलं नसेल...

जिंदगी जिंदाबाद! 'ही' दिव्यांग व्यक्ती आहे सोशल मीडिया स्टार, त्याचा आत्मविश्वास पाहून ठोकाल त्याला सलाम...

Web Title: Snake drinking water from humans palm video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.