आररं खतरनाक! सापाला ओंजळीने पाणी भरवतोय, याच धाडस पाहुन नेटकरी झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 05:04 PM2022-01-14T17:04:04+5:302022-01-14T17:04:16+5:30
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या हाताच्या पंजामध्ये पाणी घेऊन ते सापाला पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
साप लहान असो वा मोठा, त्याला पाहताच लोकांची अवस्था वाईट होते. अशात तुमचा सामना एखाद्या विशालकाय सापासोबत झाला तर? सहाजिकच कोणाचीही घाबरगुंडी उडेल. सापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही धावू लागाल. मात्र, सध्या सोशल मीडियावर सापाचा एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या हाताच्या पंजामध्ये पाणी घेऊन ते सापाला पाजताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये (Shocking Video of Snake) तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने जमिनीवर एक प्लेट ठेवलेली आहे आणि त्याच्या हातामध्ये पाण्याने भरलेला एक ग्लास आहे. हा व्यक्ती ग्लासमधील पाणी आपल्या हातावर ओतून ते सापाला पाजताना दिसतो. अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. व्हिडिओमधील साप अतिशय भीतीदायक दिसत आहे. मात्र, हातावरील पाणी पिताना साप व्यक्तीवर हल्ला करत नाही.
हे दृश्य खरोखरच हैराण करणारं आहे. कारण साप एक विषारी जीव आहे. सापाने चावा घेतल्यास माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. याच कारणामुळे सापाला पाहूनच माणसासोबतच मोठमोठे प्राणीही आपला रस्ता बदलतात. मात्र, हा व्यक्ती सापाला ज्या पद्धतीने आपल्या हाताने पाणी पाजत आहे, ते पाहून कोणाचाही थरकाप उडेल.
सापाचा हा हैराण करणारा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर snakes.empire नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ 8 जानेवारीला इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला आहे. तेव्हापासून आतापर्यंत 2 लाख 13 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. हा आकडा सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. तर काही यूजर्सनी हा वेडेपणा असल्याचंही म्हटलं आहे.
एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हा व्यक्ती वेडा आहे. साप कधीच माणसाचा मित्र बनू शकत नाही आणि हा सापाला हाताने पाणी पाजत आहे. तर, दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहिलं, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतील, की आता हा व्यक्ती नाही राहिला. तर आणखी एकाने लिहिलं, पाणी पिताना अगदी विषारी सापही सुंदर दिसू लागतो.