ह्या फोटोमध्ये दडलाय एक बिबट्या; शोधून काढल्यास आनंदाने वाजवाल शिट्ट्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 05:21 PM2019-05-18T17:21:30+5:302019-05-18T17:24:34+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक फोटो चांगलाच व्हायरल झाला असून यात एका जनावराचा शोध घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात एक फोटो चांगलाच व्हायरल झाला असून यात एका जनावराचा शोध घेतला जात आहे. खरंतर या फोटोत एक हिम बिबट्या आहे. पण अनेक प्रयत्न करूनही अनेकांना तो दिसत नाहीये. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी लोकांना चांगलंच लक्ष केेंद्रीत करावं लागत आहे.
या फोटोतील डोंगरात हिम बिबट्या लपलेला आहे. तर डोंगराच्या आजूबाजूला बर्फ आहे. मात्र हा फोटो इतका परफेक्ट क्लिक करण्यात आला आहे की, यात बिबट्याला शोधण्यासाठी फारच मेहनत करावी लागते आहे. सौरभ देसाईने हा फोटो काढला आहे. सौरभ देसाई हे प्रसिद्ध वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आहेत.
सौरभ देसाई यांनी हा फोटो हिमाचल प्रदेशातील स्पीति व्हॅलीमध्ये काढला आहे. फारच सुंदरतेने हा फोटो त्यांनी काढला आहे. त्यांनी हा फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याला त्यांनी 'आर्ट ऑफ कॅमॉफ्लज' असं कॅप्शन दिलं आहे.
आता काही लोकांना यात बिबट्या दिसतो आहे तर काहींना दिसत नाहीये. पण हा फोटो व्हायरल झालाय. ज्या लोकांना या बिबट्या दिसला ते आता दुसऱ्यांना या बिबट्या शोधण्याचं चॅलेन्जही देत आहेत.