भर पावसात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तरूणाचं जबरदस्त काम, रस्त्यात सुरू केलं रिलॅक्स स्टेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 02:25 PM2023-07-14T14:25:36+5:302023-07-14T14:28:15+5:30

Relax Station For Delivery Agent : डिलिव्हरी बॉयसाठी एक तरूण सध्या फारच चांगलं काम करत आहे. सिद्धेश लोकरे असं या तरूणाचं नाव असून तो एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याने या डिलिव्हरी बॉयसाठी एक छोटसं रिलॅक्स स्टेशन सुरू केलं आहे.

Social media content creator Siddhesh Lokare creates relax station for delivery agents working | भर पावसात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तरूणाचं जबरदस्त काम, रस्त्यात सुरू केलं रिलॅक्स स्टेशन

भर पावसात फिरणाऱ्या डिलिव्हरी बॉयसाठी तरूणाचं जबरदस्त काम, रस्त्यात सुरू केलं रिलॅक्स स्टेशन

googlenewsNext

Relax Station For Delivery Agent : सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. बरेच लोक घरीच काहीतरी गरमागरम पदार्थ बनवून पावसाचा आनंद घेतात. तर काही लोक लगेच फोन करून बाहेरून ऑर्डर करतात. अशात इतक्या पावसातही डिलिव्हरी बॉइजना त्यांची ऑर्डर वेळेत कस्टमरकडे पाठवयची असते. डिलिव्हरी बॉय भर पावसात वेळेत आपली ऑर्डर कस्टमरकडे पोहोचवतो. 

पावसाळ्यात मोठ्या शहरांमध्ये असं दृश्य नेहमीच बघायला मिळतं. भलेही उकाडा असो, मुसळधार पाऊस असो वा थंडी असो डिलिव्हरी बॉय त्यांची ऑर्डर वेळेत पोहोचवतात. मग ते उपाशी असो भिजलेले असो, त्यांना थंडी वाजत असोत वा उन्ह लागत असो. त्यांचे काम ते वेळेत करतात.

याच डिलिव्हरी बॉयसाठी एक तरूण सध्या फारच चांगलं काम करत आहे. सिद्धेश लोकरे (Siddesh Lokare) असं या तरूणाचं नाव असून तो एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याने या डिलिव्हरी बॉयसाठी एक छोटसं रिलॅक्स स्टेशन सुरू केलं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या या रिलॅक्स स्टेशनमध्ये डिलिव्हरी बॉइजना चहा, समोसा आणि रेनकोटही देतो.

सिद्धेशने याचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला असून याचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. कारण याने डिलिव्हरी बॉयना बरीच मदत मिळते आणि थोडा वेळ ते रिलॅक्स होऊ शकतात. लोक सिद्धेशचे यासाठी आभारही मानत आहेत.

Web Title: Social media content creator Siddhesh Lokare creates relax station for delivery agents working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.