"हे माझं रोजचं आहे"; १४० किमी वेगात गाडी चालवत यूट्यूबरने बाईकला दिली धडक, Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 06:56 PM2024-08-30T18:56:46+5:302024-08-30T18:58:54+5:30
Rajat Dalal Viral Video : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलाल याचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Fitness influencer Rajat Dalal : गेल्या काही दिवसांपासून देशभरात भरधाव कारमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच यूट्यूबर आणि फिटनेस इन्फ्लुएन्सर रजत दलाल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती रजत दलाल असून तो गाड्यांची गर्दी असलेल्या रस्त्यावर १४० पेक्षा अधिक किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत आहे. ओव्हरस्पीड करत असताना त्याने दुचाकीस्वाराला धडक दिली आणि थांबण्याची तसदीही घेतली नाही. त्याच्या शेजारच्या सीटवर एक महिलाही बसलेली होती जी रजत दलालला हळू चालवायला सांगत होती. मात्र त्याने हे रोजचं असल्याचे सांगत त्याकडे दुर्लक्ष केले.
दीपिका नारायण भारद्वाज नावाच्या पत्रकाराने हा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रजत दलाल विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ही कार रजत दलाल चालवत होता असा दावा पत्रकाराने केला आहे. कारमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी बसली होती आणि गाडी सुसाट वेगाने गर्दीने भरलेल्या रस्त्याने जात होती. मुलीने गाडीचा वेग कमी करायला सांगितल्यावर रजत दलाल म्हणतो, तू बेफिकीर राहा. यादरम्यान एका दुचाकीस्वाराला रजत दलालच्या गाडीची जोरदार धडक बसली. यावर शेजारी बसलेल्या मुलीने सर सर, तो पडला, असे करू नका म्हटलं. त्यावर रजत दलालने मला कोणी पडले तरी फरक पडत नाही. हे रोजचे काम आहे, असं प्रत्युत्तर दिलं.
यावर ती मुलगी पुन्हा रजत दलालला थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रजतने, तू काय छान व्यक्ती आहेस का, असं म्हटलं. ५५ सेकंदाचा हा व्हिडिओ कारच्या मागील सीटवर बसलेल्या कोणीतरी शूट केला असावा. ही कार महामार्गावर ताशी १४० किलोमीटर वेगाने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून रजत दलालला हरियाणा पोलिसांनी त्याला अटक करण्याची मागणी करत आहेत.
"GIR GAYA KOI BAAT NAHI. YE TO HAMARA ROZ KA KAAM HAI "
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) August 29, 2024
Habitual Offender #RajatDalalPsycho hits a biker while driving at a speed of 143Kmph on a busy inner city highway
PLZ IDENTIFY ROAD & TAG COPS@dtptraffic@FBDPolice@police_haryana@cmohry@noidatraffic@gurgaonpolicepic.twitter.com/RD2sEQVsnd
रजत दलालचे स्पष्टीकरण
"व्हायरल होत असलेला व्हिडिओ जुना आहे. मला हा व्हिडीओ कधीचा आहे आठवत नाही. मी या सर्व गोष्टी मागे सोडल्या आहेत. हा मला फसवण्याचा प्रयत्न आहे किंवा माझ्या मते मिळवण्याचा प्रयत्न आहे हे मला माहीत नाही. मी यातून धडा शिकलो आहे आणि मी आता किंवा भविष्यात कोणाशीही भांडणार नाही तोपर्यंत तुम्ही धीर धरा," असं स्पष्टीकरण रजत दलालने एका व्हिडीओतून दिलं आहे.
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. फरिदाबाद पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी तपास सुरु आहे, दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असे फरिदाबाद पोलिसांनी म्हटलं आहे.