... तेव्हा व्हेस्पा स्कूटर फक्त 2243 रुपयांत मिळत होती? बिलाचा फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 12:44 PM2023-07-08T12:44:44+5:302023-07-08T12:45:01+5:30
व्हेस्पा स्कूटर 2129 रुपयांना विकली गेली होती, या व्हायरल फोटोमध्ये व्हेस्पा स्कूटरची किंमत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
बजाज हे ऑटोमोबाईल उद्योगातील एक मोठे नाव आहे. आजही देशातील अनेक घरांमध्ये तुम्हाला बजाज कंपनीची स्कूटर दिसून येईल. दरम्यान, कंपनीने आपले जुने मॉडेल्स बंद केले असले तरी 1960 ते 90 च्या दरम्यान आलेले काही मॉडेल्स आजही लोकांच्या मनात कायम आहेत. आपल्या माहितीसाठी, सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे. खरंतर हा फोटो बजाजच्या वेस्पा स्कूटरचा आहे. 1961 मध्ये व्हेस्पा स्कूटर किती रुपयांना विकली गेली, हे या फोटोत देण्यात आलेल्या माहितीवरून समजते.
1961 मध्ये एक्साईज ड्युटीनंतर व्हेस्पा स्कूटर 2129 रुपयांना विकली गेली होती, या व्हायरल फोटोमध्ये व्हेस्पा स्कूटरची किंमत पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. या फोटोत लिहिले आहे की, ही स्कूटर नोव्हेंबर 1961 मध्ये या किमतीत विकली गेली होती. 2129 रुपयांच्या किमतीऐवजी जर एखाद्या ग्राहकाने टायर, ट्यूब इत्यादी वेगळे खरेदी केले तर त्याची किंमत 78 रुपये होती आणि पिलियन सीटसाठी 36 रुपये आकारले जात होते.
याचा अर्थ असा की सुमारे 62 वर्षांपूर्वी व्हेस्पा स्कूटर ग्राहकांना 2,500 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत होत्या. दरम्यान, जे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो खरा की खोटा, हे अद्याप समजले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोत किंमतींच्या खाली असेही लिहिले आहे की, वर नमूद केलेल्या किंमतीमध्ये केंद्रीय आणि स्थानिक राज्य कर समाविष्ट नाहीत, ज्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील. दरम्यान, ही किंमत बॉम्बे सर्कलमध्ये राहणाऱ्या ग्राहकांसाठी होती.