#BestOf2018 : 2018 मध्ये 'यांनी' घातला सोशल मीडियात सर्वात जास्त धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:25 PM2018-12-24T14:25:12+5:302018-12-24T14:30:05+5:30
२०१८ हे वर्ष आता सरतंय. या वर्षात खूपकाही घडलंय. तसं पहायला गेलं तर हे वर्ष सोशल मीडियाने फार गाजवलं. म्हणजे २०१८ मध्ये अनेकांना सोशल मीडियाने लोकप्रियता मिळवून दिली तर काहींना अधिक लोकप्रिय केले.
२०१८ हे वर्ष आता सरतंय. या वर्षात खूपकाही घडलंय. तसं पहायला गेलं तर हे वर्ष सोशल मीडियाने फार गाजवलं. म्हणजे २०१८ मध्ये अनेकांना सोशल मीडियाने लोकप्रियता मिळवून दिली तर काहींना अधिक लोकप्रिय केले. यात खासकरुन उल्लेख करावा लागेल तो प्रिया प्रकाश वारिअरचा. तसेच राजकारणातील राहुल गांधी यांचीही सोशल मीडियात चांगलीच चर्चा झाली. चला तर मग जाणून घेऊ यंदा सोशल मीडिया स्टार कोण ठरलं, ज्यांच्यामुळे सोशल मीडियाच ढवळून निघाला.
नेटफ्लिक्स इंडिया
नेटफ्लिक्सची सेवा भारतात ही २०१६ पासून सुरु झाली आहे. पण २०१८ मध्ये आपल्या ओरिजनल कंटेटमुळे नेटफ्लिक्स फारच गाजलं. फेसबुकसहीत इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरही नेटफ्लिक्सला फार पसंती मिळाली. राधिका आपटेचे कितीतरी मेम्स सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यामुळे अर्थातच त्यांची लोकप्रियता फार वाढली.
अनुष्का शर्मा
बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अनुष्का शर्मानेही सोशल मीडियात चांगला धुमाकूळ घातला. अनुष्काचे मेम्स इतके व्हायरल झाले की, ते अजूनही अनेकांच्या स्मरणात असतील. 'सुई धागा' सिनेमातील तिच्या फोटोंचे शेकडो मेम्स व्हायरल झाले होते. त्यामुळे तिला मेम्स की राणी म्हटले जाऊ लागले आणि तिलाही मान्य आहे.
दीपिका पादुकोन
दीपिकाचा पद्मावत हा सिनेमा वर्षाच्या सुरुवातीपासूनच ट्रेन्डमध्ये होता. त्यानंतर ती टाइम्सच्या १०० प्रभावशाली महिलाच्या यादीत आली. त्यानंतर कानमध्ये ती दिसली. त्यानंतर तिचं आणि रणवीरचं प्रेमप्रकरण गाजत राहिलं. आणि वर्षाचा शेवट त्यांच्या लग्नाने गाजला.
प्रिया प्रकाश वारिअर
'ओरु अदार लव्ह' या मल्याळम सिनेमाची अभिनेत्री प्रियाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आणि सगळीकडे तिच ती दिसू लागली. प्रियाच्या त्या क्लिपचे अनेक मेम्स आणि व्हिडीओही तयार करण्यात आले. पाहता पाहता प्रियाची लोकप्रियता इतकी वाढली होती की, तिने इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सबाबत झुकरबर्गलाही मागे टाकले होते.
राहुल गांधी
कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे तसे वर्षभर सोशल मीडियात चर्चेत असतात. पण वर्षाच्या शेवटी तीन राज्यांमध्ये मिळालेल्या विजयामुळे त्यांची जास्त चर्चा झाली. हा विजय कॉंग्रेसपेक्षा राहुल गांधींचा अधिक मानला गेला. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करुनही ते चर्चेत राहतात. तसेच संसदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारलेली मिठी, त्यांनतर सहकाऱ्यांकडे पाहून मारलेला डोळा यामुळेही त्यांचे अनेक मेम्स तयार करण्यात आले होते.
सुनील छेत्री
भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्री याने भारतीय लोकांना भारत आणि केनिया यांच्यातील सामना बघण्यासाठी केलेलं आवाहनही फार गाजलं. त्याचं हे ट्विट या वर्षातलं सर्वात जास्त रिट्विट केलं गेलेलं ट्विट आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल टीमला सुद्धा चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
डान्सिग अंकल
या वर्षात सर्वात हिट जर कुणी ठरलं असेल तर तो व्यक्ती आहे डान्सिग अंकल. या व्यक्तींचा गोंविदाच्या गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्यक्ती रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्याच्या मुलाखती आणि इतरही काही डान्स व्हिडीओ चांगलेच गाजले.
'हेलो फ्रेन्ड्स चाय पिलो'
'हेलो फ्रेन्ड्स चाय पिलो' सोमवती महावार या महिलेने धुमाकूळ घालता होता. तिचे चहा पितानाचे कितीतरी व्हिडीओ चर्चेचा विषय ठरले.