Video - जे, यू, पी, आय आणि पुढे....; ऑनलाईन क्लासचा परिणाम; मुलाचं इंग्रजी वाचन ऐकून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 03:29 PM2022-02-18T15:29:03+5:302022-02-18T15:37:52+5:30
ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण त्यांचा मुलावरच भलताच परिणाम होत असलेला पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर रोज नवनवीन हटके व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हे विचार करायला भाग पाडतात तर काही खळखळून हसवतात. सध्या देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा परिणाम हा देशातील मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे. संसर्ग रोखण्यासाठी आणि मुलांच्या आरोग्याचं हित लक्षात घेता शाळा बंद करण्यात आल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण त्यांचा मुलावरच भलताच परिणाम होत असलेला पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा स्कूटीवरचं नाव वाचताना दिसत आहे. सुरुवातीला तो नावाचं प्रत्येक अल्फाबेट मोठ्यानं वाचतो. त्यानंतर एकत्रपणे त्याचा वेगळाच उल्लेख करतो. तो जे काही म्हणतो ते ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. काही सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला मुलगा स्कूटीवर लिहिलेल्या त्या कंपनीचं नाव वाचायचा प्रयत्न करतो. तो प्रत्येक अल्फाबेट व्यवस्थितरित्या वाचतो. त्यावर ज्युपिटर (JUPITER) लिहिलेलं आहे.
मुलगा त्याचा उल्लेख स्कूटी असा करतो. हा ऑनलाईन क्लासचा परिणाम असल्याचंही नेटकऱी म्हणत आहेत. comedynation.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या तो तुफान व्हायरल होत असून लोकांना देखील खूप जास्त आवडला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. अनेकांनी त्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.