Social Viral: मि. इंडियाचा लाल गॉगल न लावताही 'खास' इन्स्टा स्टोरीवर पाळत ठेवणे शक्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 04:38 PM2024-03-12T16:38:22+5:302024-03-12T16:39:14+5:30
Social Viral : दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याची आपल्याला फारच हौस, यासाठी अदृश्य राहून इन्स्टाग्राम स्टोरी पाहण्यासाठी ४ खास टिप्स!
सद्यस्थितीत एखाद्याचे व्यक्तिगत आयुष्य जाणून घ्यायचे असेल तर सोशल मीडियावर अकाउंट पाहिले जाते. इतर सोशल अकाउंटच्या तुलनेत सध्याची तरुणाई इंस्टाग्राम वर जास्त ऍक्टिव्ह दिसते. वेगवेगळ्या पोस्ट, कमेंट्स, शेअरिंग सुरु असतेच आणि ते कमी म्हणून की काय स्टेटसवर देखील पोस्ट पडत असतात.
जगातील जवळपास करोडो लोक हे ॲप वापरतात. कंटाळा आला की रिल्स बघतात. रील स्वतः बनवात आणि पोस्ट करतात. पोस्ट कधी पब्लिक असतात तर कधी प्रायव्हेट. तसेच स्टेटस देखील प्रायव्हेट किंवा पब्लिक असू शकते. मात्र स्टेट्सच्या बाबतीत ते कोणी कोणी पाहिले हे युजरला कळते. त्यामुळे काही जण इच्छा असूनही काही जणांचे स्टेट्स पाहण्याचे काही जण डेअरिंग करत नाही. अशा वेळी एक पळवाट इन्स्टाग्रामनेच सुचवली आहे, ती म्हणजे तुम्हाला चक्क अदृश्य ठेवून अर्थात तुमचे नाव न दिसताही तुम्हाला इन्स्टा स्टेट्स पाहता येणार आहे. त्यासाठी पुढील चार पर्याय वापरून बघा!
पहिला मार्ग :
हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे Instagram सुरू करा आणि स्टेटस अपलोड होऊ द्या. जेव्हा स्टेटस वर्तुळ पूर्णपणे दिसेल, तेव्हा फोन एरोप्लेन मोडवर ठेवा आणि ५ ते १० सेकंद प्रतीक्षा करा. आता पुन्हा Instagram उघडा आणि तुम्हाला ज्यांचे स्टेट्स बघायचे आहे त्यावर टॅप करा. असे केल्याने, स्टेट्स उघडेल, तुम्हाला पाहता येईल आणि तुमचे नाव स्टेट्स पाहिलेल्यांच्या यादीत दिसणार नाही.
दुसरा मार्ग :
तुम्हाला कोणाचे स्टेट्स पहायचे असेल तर त्यावर क्लिक करा, बघा आणि मग त्या व्यक्तीला ठराविक कालावधीसाठी ब्लॉक करा. त्यामुळे तुमचे नाव दर्शकांच्या यादीमध्ये येणार नाही. मात्र काही काळाने त्या व्यक्तीला अनब्लॉक केल्यावर तुम्हाला परत फॉलोची रिक्वेस्ट टाकावी लागेल. त्यामुळे हा पर्याय तात्पुरता बरा असला तरी फार काळासाठी उपयोगी नाही.
तिसरा मार्ग :
काही थर्ड पार्टी ॲप्स किंवा वेबसाइट्स आहेत ज्यात सेटिंग करून तुम्ही दर्शकांच्या यादीत न येता कथा पाहू शकता. मात्र, अशा अँप्सच्या वापरामुळे तुमच्या गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डाटा चोरी होण्याची भीती असते.
चौथा मार्ग :
तुम्ही इंस्टाग्रामवर एकापेक्षा जास्त अकाउंट बनवू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही दुसरे खाते तयार करून दुसऱ्याची गोष्ट पाहू शकता. तथापि, ही युक्ती केवळ तेव्हाच उपयोगी पडेल जेव्हा दुसऱ्या व्यक्तीचे खाते प्रायव्हेट ठेवले नसेल आणि प्रायव्हेट असले तरी त्यांनी सहभागी केलेल्या यादीत तुमचे नाव नसेल, तरच हाही पर्याय उपयुक्त ठरू शकेल.