पाकिस्तान ते भारत प्रवास, रेल्वेच्या AC-3 कोचचं भाडे फक्त ४ रुपये; तिकीट पाहून लोक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 02:42 PM2023-01-21T14:42:49+5:302023-01-21T14:43:47+5:30
सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे.
नवी दिल्ली - स्वातंत्र्याच्या काळातील दराचे रेल्वे तिकीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे तिकीट पाकिस्तानमधील रावळपिंडी ते अमृतसर दरम्यानच्या प्रवासासाठी आहे. नऊ प्रवाशांच्या प्रवासासाठी हे तिकीट काढण्यात आले होते. सोशल मीडियावर एवढं जुनं तिकिट आणि किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत. त्यावेळी नऊ जणांच्या तिकिटासाठी केवळ ३६ रुपये आणि ९ आणे आकारले जात होते. लोक आजच्या तिकीट दराशी याची तुलना करत आहेत.
तिकीट सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेल्वेचे तिकीट पाकिस्तान रेल लव्हर्स नावाच्या पेजने फेसबुकवर शेअर केले आहे. तिकिटाचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १७-०९-१९४७ रोजी रावळपिंडी ते अमृतसर प्रवास करण्यासाठी ९ लोकांना जारी करण्यात आलेल्या रेल्वे तिकिटाचा हा फोटो आहे. ज्याची किंमत ३६ रुपये आणि ९ आणे आहे. कदाचित एखादे कुटुंब भारतात गेले असावे. हे ९ लोकांसाठी तिकीट आहे. म्हणजे त्याकाळी माणसाचे भाडे सुमारे ४ रुपये असायचे.
पेनाने लिहून दिलेले तिकीट
या रेल्वे तिकीटाची तारीख १७ सप्टेंबर १९४७ आहे. पेनच्या साहाय्याने हे तिकीट हाताने बनवले आहे. त्याकाळी संगणकीकृत तिकीट प्रचलित नव्हते. तिकीट उत्तर पश्चिम रेल्वेचे आहे. एसी-३ कोचचे असल्याचेही तिकिटावर लिहिलेले आहे. या पोस्टच्या कमेंटमध्ये लोकांनी सांगितले की, स्वातंत्र्यापूर्वी पाकिस्तानच्या भागात नॉर्थ वेस्टर्न रेल्वे झोन होता. तिकिटावरील हे तिकिट परदेशी नागरिकाचे आहे, अशी प्रतिक्रिया काही लोकांनी दिली. बरं, त्यावेळी पाकिस्तानातून भारतात येण्यासाठी तिकीट मिळणं सोपं होतं, पण आता ही प्रक्रिया खूपच अवघड झाली आहे.
A train ticket from #Rawalpindi to #Amritsar for a family of 9 people travelling on 17th September 1947.
— Varun (@Ambarseriya) January 19, 2023
This is post independence of both #India and #Pakistan costing 36rs and 9annas. ( pic from internet) pic.twitter.com/lKUwPSLxaS
रेल्वेचे जुने तिकीट पाहून पोस्टवर कमेंटचा पाऊस
१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. यानंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले. हे तिकीट त्या कुटुंबांपैकी कोणाचेही असू शकते. फोटोवर कमेंट करत लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. तारा चंद नावाच्या यूजरने लिहिले की, 'त्या काळात ही किंमत खूप जास्त असतील, काही श्रीमंत लोक असतील, सामान्य लोक पायी चालत होते.