Video: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासाठी जवानांनी गायले 'संदेसे आते हैं', व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 12:16 PM2022-09-30T12:16:18+5:302022-09-30T12:27:40+5:30
सध्या सोशल मीडियावर जवानांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जवान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर 'संदेसे आते है, हे गाणे गात असल्याचे दिसत आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर जवानांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत जवान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर 'संदेसे आते है, हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. यावेळी जवानांसोबत राजनाथ सिंह गात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ आसाम मधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बुधवारी आसाम दौऱ्यावर होते. त्यांनी आसाममधील दिनजान मिलिस्ट्री स्टेशनचा दौरा केला. यावेळी जवानांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. जवानांनी राजनाथ सिंह यांचे 'संदेसे आते है' हे गाणे गाऊन स्वागत केले. हा व्हिडीओ अनेकांना आवडला आहे, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत संरक्षण मंत्री यांच्या बाजूला जवान उभे असल्याचे दिसत आहे. हे जवान 'संदेसे आते है' हे गाणे गात आहेत, या गाण्याचा आनंद राजनाथ सिंह घेत असल्याचे दिसत आहे. जवानांच्याती उत्साह पाहून अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
#WATCH | Indian Army jawans sing 'Sandese Aate Hain' as Defence Minister Rajnath Singh interacts with them at Dinjan military station in Assam. Army chief General Manoj Pande and other top officers of the Army also accompanied the Defence Minister. pic.twitter.com/VHgFX5QX82
— ANI (@ANI) September 28, 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसाम दौऱ्यावर आहेत. यावेळी ते दिनजान मिलेटरी स्टेशनवर पोहोचले तेव्हा जवानांनी त्यांच्या स्वागतासाठी हे गाणे गायले. त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कराचे इतर उच्च अधिकारीही तेथे उपस्थित होते.
बाप हा बापच असतो.. मिडलक्लास असो किंवा BCCI सेक्रेटरींचा.. जय अन् अमित शाहांचा Video Viral
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. लाखो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तर अनेकांनी कमेंटही केली आहे. 'संदेसे आते है',हे गाणे दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या बॉर्डर या चित्रपटातील आहे. हे गाणे गायक सोनू निगम आणि कुमार राठोड यांनी गायले आहे.