पिंक टॉयलेटमध्ये सुरू केलं चिप्स, कोल्ड ड्रिंकचं दुकान; लोक म्हणाले -इथे काहीही होऊ शकतं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 17:16 IST2025-01-10T16:40:55+5:302025-01-10T17:16:28+5:30
Chips Shop In Women Pink Toilet: हे बघून लोक अवाक् झाले आहेत. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एक व्यक्ती म्हणाली की, बिहारमध्ये काहीही शक्य आहे.

पिंक टॉयलेटमध्ये सुरू केलं चिप्स, कोल्ड ड्रिंकचं दुकान; लोक म्हणाले -इथे काहीही होऊ शकतं!
Chips Shop In Women Pink Toilet: सोशल मीडिया एक व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होत आहे. ज्यात एका पिंक टॉयलेटमध्ये दुकान लावल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ बिहारची राजधानी पाटण्याचा असल्याचं सांगण्यात येत आहे. पिंक टॉयलेट महिलांसाठी बनवले जातात. पण यात तर चिप्स, कुरकुरे आणि इतरही काही वस्तू विकल्या जात असल्याचं बघायला मिळालं. हे बघून लोक अवाक् झाले आहेत. व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. एक व्यक्ती म्हणाली की, बिहारमध्ये काहीही शक्य आहे.
व्हिडिओत बघू शकता की, पिंक टॉयलेट पूर्णपणे एखाद्या किराणा दुकानासारखं वापरलं जात आहे. ज्यात कुरकुरे, चिप्स, बिस्कीट आणि कोल्ड ड्रिंक्स विकलं जात आहे. टॉयलेटच्या दरवाज्यावर 'पिंक टॉयलेट' लिहिलेलं स्पष्ट दिसत आहे. पण आतला नजारा काही वेगळाच आहे. कुणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि आता व्हायरल झाला आहे.
बिहार मे कुछ भी सम्भव हैं आपदा मे अवसर ढूढ़ लेते है 😂😂 pic.twitter.com/C1aSVgRL05
— दिव्या कुमारी (@divyakumaari) January 8, 2025
व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहिलं की, 'बिहारमध्ये काहीही शक्य आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं की, 'टॉयलेट आणि दुकानाचं कॉम्बिनेशन...इनोव्हेशनची सीमा'. तर काही लोकांनी हे बेकायदेशीर असून यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.