आधी मार मार मारले नंतर मुलासोबत केला डान्स, बाप लेकाच्या नात्याचा हा विचित्र व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:07 PM2021-10-29T19:07:02+5:302021-10-29T19:07:12+5:30

असं म्हणतात मुलगा जेव्हा बापाच्या चपला घालु लागतो तेव्हा वडिलांनी त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत या गोष्टी कठीण असल्या तरी आता हळु हळु हा बदल घडतो आहे. नेमकी याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

son and father dancing on in da ghetto song goes viral | आधी मार मार मारले नंतर मुलासोबत केला डान्स, बाप लेकाच्या नात्याचा हा विचित्र व्हिडिओ व्हायरल

आधी मार मार मारले नंतर मुलासोबत केला डान्स, बाप लेकाच्या नात्याचा हा विचित्र व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

असं म्हणतात मुलगा जेव्हा बापाच्या चपला घालु लागतो तेव्हा वडिलांनी त्याच्याशी मित्रत्वाचे नाते जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत या गोष्टी कठीण असल्या तरी आता हळु हळु हा बदल घडतो आहे. नेमकी याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. यात वडिल आणि मुलाचा डान्स बघुन तुम्हाला हसु आवरणार नाही...

हा व्हिडिओ प्रतीक या युजरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये प्रतीक त्याच्या वडिलांसोबत आधी आणि नंतरची परिस्थिती दाखवत आहे. पहिल्या शॉटमध्ये त्याचे वडील त्याला मारत आहेत, पण नंतर तो वडिलांसोबत नाचू लागतो. व्हिडिओमध्ये वडील आणि मुलाने ज्या पद्धतीने डान्स केला ते खूपच मजेदार आहे आणि त्यांच्या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत. व्हिडिओत Da Ghetto, J Balvin and Skrillex यांच्या In Da Getto गाण्यावर दोघेही नाचले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर ५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून आताही नेटिझन्स या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले, ‘हा क्षण खूप छान आहे’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘आजच्या आधी वडील आणि त्याच्या मुलाचे असं नातं मी पाहिले नाही’ तिसऱ्या यूजरने लिहिले, 'माझी इच्छा आहे की प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांच्या इतकाच जवळ असता.' याशिवाय, बहुतेक वापरकर्ते व्हिडिओवर इमोजी शेअर करून खूप प्रेम देत आहेत.

Web Title: son and father dancing on in da ghetto song goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.