मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांनी हिरावली शेजाऱ्यांची शांतता, आईला 27,000 रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 05:04 PM2022-09-22T17:04:32+5:302022-09-22T17:11:00+5:30
मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी क्षणांमुळे मुलाच्या आईला दंड भरावा लागला.
नवी दिल्ली : अनेक लोकांचा असा समज असतो की ते त्यांच्या खासगी घरात, त्यांच्या बेडरूममध्ये काहीही करू शकतात आणि त्यामुळे कोणाला काही फरक पडत नाही. काही प्रमाणात ते ठीक देखील आहे, मात्र तुम्ही केलेल्या कामामुळे इतरांना त्रासही होऊ शकतो. त्यामुळे चार भिंतींच्या आत केलेल्या कृतीकडे अधिक लक्ष देण्याची जबाबदारी तुमची आहे. कारण असे न केल्यास अडचणी वाढू शकतात. असाच एक प्रकार वेल्समधील एका महिलेच्या बाबतीत घडला आहे.
दरम्यान, मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडने शेजाऱ्यांची (Woman fine 27000 rupees due to son and her girlfriend) शांतता हिरावल्याप्रकरणी त्या शेजाऱ्यांनी खटला दाखल केला. शेजाऱ्यांनी संबंधित मुलाच्या आईविरोधात दाखल केलेल्या खटल्यामुळे मुलाच्या आईला तब्बल 27,000 रूपयांचा दंड भरावा लागला. खरं तर वेल्सची रहिवासी असलेल्या 41 वर्षीय क्रिस्टिन मॉर्गन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांच्या शेजाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे की जोडप्याच्या रोमँटिक आवाजामुळे शेजाऱ्यांना त्रास होतो. ज्यामुळे त्यांच्या घरातील झोप आणि शांतता हिरावून घेतली जाते. शेजाऱ्यांनी अनेकवेळा लव्ह मेकिंगच्या (Couple romantic noise disturb neighbours) आवाजाची तक्रार केली असता प्रशासनाने हा प्रकार लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.
मुलगा आणि त्याच्या गर्लफ्रेंडमुळे आईला भरावा लागला दंड
क्रिस्टीन या त्यांचे वृद्ध वडील, 23 वर्षांचा मुलगा आणि 20 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत राहतात. रेक्सहॅम काउंटी बुरो काउन्सिलमध्ये या प्रकरणाची सुनावणी झाली, जिथे कोर्टाने क्रिस्टीन यांना 27 हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यानंतर क्रिस्टीन यांनी न्यायालयात सांगितले की, त्या आवाजांना त्यांचा मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड जबाबदार आहे. न्यायालयानेही मान्य केले की क्रिस्टीन या नाईट शिफ्ट करतात, त्यामुळे तो आवाज त्यांचा असू शकत नाहीत. परंतु शेजाऱ्यांनी तक्रार केली आहे की आवाज त्यांच्या घरातून आले आहेत जे रोमँटिक क्षणांचे आहेत.
मागील वर्षांच्या डिसेंबरपासून वाढला होता आवाज
शेजाऱ्यांचे म्हणणे आहे की, या आवाजामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. मध्यरात्री आवाज मोठ्या प्रमाणात येतो. सर्वप्रथम जुलै 2020 मध्ये असा आवाज आला होता, जेव्हा क्रिस्टिन यांच्या घरी मोठ्या आवाजात पार्टी केली जात होती. त्यानंतर रोमँटिक क्षणांचे आवाज ऐकू यायला लागले. मागील वर्षीच्या ख्रिसमसपासून या आवाजात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. शेजाऱ्यांच्या घराबाहेरील आवाज रेकॉर्ड करण्यासाठी प्रशासनाकडून नॉईज मॉनिटर बसवण्यात आला होता, ज्यावरून हा आवाज संभोग करताना असल्याचा आढळून आला. आवाजामुळे शेजाऱ्यांना स्वतःच्या घरात सुखाने राहता येत नाही आणि कधी कधी लाजिरवाणेही व्हावे लागते. म्हणून क्रिस्टीन यांच्या मुलावरही पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत 4 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे.