आई ती आईच! मुलाने बनवला कोबीचा पराठा, त्यावर आई जे बोलली ते वाचून पोट धरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 11:50 AM2020-03-28T11:50:46+5:302020-03-28T11:53:10+5:30
दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने लॉकडाउन दरम्यान कोबीचा पराठा तयार केला आणि त्याचा फोटो आईला व्हॉट्सअॅप केला.
कोरोना व्हायरसता धोका टाळण्यासाठी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. कित्येक लोक घरात बंद आहेत. पोलिसांचे लोकांना फटके देतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तर कुठे लोकांच्या मदतीचे व्हिडीओ समोर येत आहेत. अशात दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाने लॉकडाउन दरम्यान कोबीचा पराठा तयार केला आणि त्याचा फोटो आईला व्हॉट्सअॅप केला. आता शेवटी ती आईच ना...सर्व आयांसारखंच ती बोलली.
अक्षर पाठक नावाच्या व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केल आहे. हा फोटो पराठ्याचा आहे जो त्याने त्याच्या आईला व्हॉट्सअॅप केला होता. त्याने आईला सांगितले की पराठ्याला रेटींग दे. आईने 11/10 रेटींग दिलं. नंतर लिहिलं की, 'केळ पडून पडून खराब होत आहे'. या फोटोत एक केळंही दिसत आहे. जे खराब होत असल्याचं दिसतं. आईची नजर त्यावरही गेली.
"banane pade pade kharaab ho raha hai" is every Indian mom ever! No details missed, not one! https://t.co/X7t5qDfBsV
— Shabdika Pandey (@shabdtweets) March 27, 2020
Oh I thought it was just my mom. https://t.co/Zks7s1Kczw
— Radhika Misra (@RadhikaMisra91) March 27, 2020
Awww this is so cute..tareef and daant ek hi chat mein ..only a Mum 🙂🙂
— Harpreet Kaur (@hkaur1409) March 27, 2020
Mom has eyes everywhere...😂Banana kharab horaha hy shake bana lo..
— Chai Chahiyah... (@ChaiChahiyah) March 27, 2020
Moral of story- Improve your cropping skills
— Anu M (@stylistanu) March 27, 2020
आता या फोटोवर अनेकांनी मजेदार रिप्लाय केले आहेत. अशाप्रकारच्या कमेंट भारतीय आईच करू शकते असेही काही लोक बोलत आहेत.