६६ वर्षीय गृहस्थानं केलं दुसरं लग्न; अन् सावत्र आईसह वडिलांचा फोटो पोस्ट करत लेक म्हणाला.....
By Manali.bagul | Published: December 3, 2020 04:02 PM2020-12-03T16:02:03+5:302020-12-03T16:09:50+5:30
Viral News in Marathi: प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा या उदाहरणातून दिसून आलं आहे.
प्रेम हा फक्त दोन अक्षरी शब्द आहे. पण त्यासाठी लोक काही करायला तयार होत असतात. अशीच एक आगळी वेगळी प्रेम कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ६६ वर्षीय कांती पाल यांनी ६३ वर्षीय स्वप्ना रॉय यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. विशेष म्हणजे ही प्रेमकहाणी त्यांचा मुलगा शायोन पाल याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. शायोनने या जोडप्याचा फोटो शेअर करत हृदयस्पर्शी कॅप्शन या फोटोला दिलं आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा या उदाहरणातून दिसून आलं आहे.
So, my Dad got married the day before. The ceremony was (mostly) masked and just with close friends & family. It was both surreal and fun. After 10 years of being alone since my mom died, I’m glad that he found love again! pic.twitter.com/qGaD3u5CuA
— Shayon (@shayonpal) November 27, 2020
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हे जोडपं खूप आनंदी दिसत आहे. या फोटोने लोकांची मनं जिंकली आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'माझ्या वडिलांनी एक दिवसापूर्वी लग्न केलं. हे लग्न जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. माझ्या आईला वारून १० वर्ष झाल्यानंतर माझ्या वडिलांना पुन्हा आपलं दुसरं प्रेम मिळालं याचा मला आनंद आहे.'
काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....
शायोन पाल यांनी हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना आपले वडील सावत्र आईला कसे भेटले तसंच त्यांच्या प्रेमकथेला सुरूवात कुठून झाली.याबाबत माहिती दिली. हे दोन्ही पश्चिम बंगालच्या हावडाच्या भट्टनगर परिसरातील आहेत. या दोघांची भेट एका समारंभात झाली. सुरूवातीला ते एकमेकांना फारसे ओळखत नव्हते. हळू हळू बोलणं वाढत गेलं आणि त्या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं. शायोनने दिलेल्या माहितीनुसार लग्नामुळे सगळेचजण खूप खुश आहेत.
जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ
हे लग्न कोरोनाकाळात झाल्यामुळे माहामारीच्या सगळ्याच नियमांचे पालन करण्यात आले होते. नेटिझन्सनी या कपल्सना शुभेच्छा देताना कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ८ हजारापेक्षा जास्त लोकांना या फोटोला लाईक केलं आहे. तर ५०० पेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे.