विद्यार्थ्यांना मानवी शरीर रचना शिकवण्यासाठी शिक्षिकेने लावली आयडियाची कल्पना, फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 03:31 PM2019-12-26T15:31:47+5:302019-12-26T15:32:02+5:30
प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. काही शिक्षक प्रेमाने शिकवतात, काही रागावतात तर काही आणखी वेगळ्या पद्धतींचा वापर करतात.
प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची एक वेगळी पद्धत असते. काही शिक्षक प्रेमाने शिकवतात, काही रागावतात तर काही आणखी वेगळ्या पद्धतींचा वापर करतात. या मुद्द्यावरून स्पेनमधील एक शिक्षिका चांगली चर्चेत आली आहे. या शिक्षिकेचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शरीर रचनेचे धडे देण्यासाठी Anatomy Bodysuit घातला.
शिक्षिकेच्या या अनोख्या आयडियाची ट्विटरवर चांगलंच कौतुक होत आहे. या शिक्षिकेचं नाव वेरोनिका ड्यूक असं असून ती स्पेनच्या वेलेडोलिड स्कूलमध्ये जीवशास्त्र हा विषय शिकवते. लहान मुलांना मानवी अवयवांबाबत चांगल्याप्रकारे देण्यासाठी त्यांनी ही अनोखी पद्धत वापरली. विद्यार्थ्यांनी देखील त्यांना ही पद्धत आवडल्याचं सांगितलं.
Muy orgulloso de este volcán de ideas que tengo la suerte de tener como mujer😊😊
— Michael (@mikemoratinos) December 16, 2019
Hoy ha explicado el cuerpo humano a sus alumnos de una manera muy original👍🏻
Y los niños flipando🤣🤣
Grande Verónica!!!👏🏻👏🏻😍😍 pic.twitter.com/hAwqyuujzs
वेरोनिका १५ वर्षांपासून इंग्रजी, कला, इतिहास आणि स्पॅनिश हे विषय शिकवते आहे. त्यांनी सांगितले की, लहान मुलांना बोर्डवर चित्र काढून समजावण्यात अनेक अडचणी जातात. काही विद्यार्थ्यांना समजतं तर काहींना समजत नाही. त्यामुळे मी हा पर्याय निवडला. मी मानवी शरीर रचना असलेला एक बॉडीसूट तयार करून घेतला. मला असं वाटतं की, यापेक्षा मजेदार आणि सोपा दुसरा पर्याय नसला असता.
वेरोनिकाचा हा फोटो त्यांच्या पतीने सोशल मीडियात शेअर केला होता. हा फोटो आतापर्यंत १३००० पेक्षा जास्त वेळा रिट्विट तर ६६००० पेक्षा लाइक्स या फोटोला मिळाले आहेत. वेरोनिका नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांसाठी अशा नवनवीन आयडियांचा वापर करत असतात.