हिंमतीला कडक सॅल्यूट! डिलिव्हरी बॉयच्या धाडसाचं तुम्हीही कराल कौतुक; Video तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:57 PM2023-02-12T12:57:44+5:302023-02-12T13:01:29+5:30
मोटराइज्ड व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती पुढे जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने झोमॅटोचा टी-शर्ट घातला असून हेल्मेटही घातले आहे.
हिंमत असेल तर कोणतेही काम अवघड नसते असे म्हणतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यात डिलिव्हरी एजंट्सच्या संघर्षाच्या गोष्टी आहेत. त्यांच्यापासून अनेक जण प्रेरणा घेतात. पण सध्या ट्विटरवर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक दिव्यांग डिलिव्हरी बॉय दाखवण्यात आला आहे. त्यांचा हा प्रवास कोणत्याही सामान्य माणसाला प्रेरणा देणारा आहे. झोमॅटोने देखील ट्विट करून डिलिव्हरी बॉयला त्यांचा हिरो म्हटलं आहे.
छोटीशी दुखापत झाली तर आपण आपलं काम अनेक वेळा पुढे ढकलतो. काही वेळा हे निमित्त काढून चांगल्या संधी मिस केल्या जातात. पण व्हिडिओमध्ये दिसणारी ही व्यक्ती तुम्हाला नक्कीच हिंमत देईल. हिमांशू नावाच्या ट्विटर युजरने @himanshuk783 अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. अडचणींना मागे टाकून स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या एका डिलिव्हरी बॉयची ही कथा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अनेकांना हिंमत देत आहे.
Hats off to this man #Zomato#zomatoindiapic.twitter.com/36AyCdcPsB
— Himanshu (@himanshuk783) February 8, 2023
मोटराइज्ड व्हीलचेअरवर बसलेली एक व्यक्ती पुढे जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याने झोमॅटोचा टी-शर्ट घातला असून हेल्मेटही घातले आहे. हिमांशू यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. पण जेव्हा डिलिव्हरी बॉयला कळतं की कोणीतरी त्याचा व्हिडीओ काढत आहे तेव्हा तो एक सुंदर स्मितहास्य करतो. यासोबतच असेही सांगितले जाते की, आयुष्यात कधीही आशा सोडू नये. तो हिमांशूला विक्ट्री साइनही दाखवतो. जेव्हा त्याला सांगण्यात आलं की, तुम्ही हे चांगले काम करता. तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने हसून उत्तर दिलं की हो मी करतो आणि ते करायला हिंमत लागते.
आत्तापर्यंत 14 हजार वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. यावर अनेकजण प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोक तो खरा हिरो असल्याचं सांगत आहेत, तर अनेकांनी यातून प्रेरणा घेतल्याचं देखील म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी लखनौच्या एका डिलिव्हरी बॉयची गोष्टही व्हायरल झाली होती, जो गाझीपूरहून लखनऊला आला होता आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"