भरसमुद्रात बोटीवर करत होता सर्फिंग इतक्यात आला भलमोठा विचित्र जीव अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 08:21 PM2022-07-17T20:21:47+5:302022-07-17T20:45:52+5:30

याशिवाय असे काही जीव असतात जे दिसायला विचित्र असतात आणि ते काय करतील याची काहीच माहिती आपल्याला नसते. अशाच एका विचित्र जीवाने एका तरुणावर हल्ला केला आहे.

squid attacks surfing boat video goes viral on internet | भरसमुद्रात बोटीवर करत होता सर्फिंग इतक्यात आला भलमोठा विचित्र जीव अन्...

भरसमुद्रात बोटीवर करत होता सर्फिंग इतक्यात आला भलमोठा विचित्र जीव अन्...

Next

पाण्यात पोहोणं असो, बोटिंग करणं असो वा सर्फिंग करणं जितकी मजा येते तितकाच धोकाही असतो. फक्त अपघात नव्हे तर पाण्यात खतरनाक प्राणीही असतात जे कधीही हल्ला करू शकतात. आता पाण्यातील प्राण्यांचा हल्ला म्हटलं की सर्वात आधी आपल्या समोर शार्कच येतो. पण याशिवाय असे काही जीव असतात जे दिसायला विचित्र असतात आणि ते काय करतील याची काहीच माहिती आपल्याला नसते. अशाच एका विचित्र जीवाने एका तरुणावर हल्ला केला आहे (Giant squid attack man in sea video).

समुद्रातील विचित्र जीवाने तरुणावर केलेल्या भयंकर हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. सर्फिंग करताना सर्फिंग बोटवर हा विचित्र जीव आला. त्याने बोटीला धक्का मारून त्या तरुणाला पाण्यात पाडलं. त्यानंतर काय घ़डलं ते तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी पाहा.

जेम्स टेलर युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ काही वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता. जो आता पुन्हा व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता समुद्रात एक तरुण सर्फिंग बोटवर थोडावेळ बसला आहे. इतक्यात अचानक एक भलामोठा प्राणी पाण्यातून त्याच्याजवळ येतो. बोटीजवळ येताच तो पाण्यातून बाहेर येतो आणि बोटीवर चढण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर बोटीला धक्का देत बोट उलटी करण्याचा प्रयत्न करतो. बोटीवरील तरुण स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो पण त्याचा तोल जातो आणि शेवटी तो पाण्यात पडतो.

सुदैवाने तो तरुण कसाबसा पुन्हा सर्फिंग बोर्डवर चढतो. पण त्या विचित्र प्राण्याने काही बोट सोडली नाही. हा विचित्र जीव म्हणजे स्क्विड आहे. ऑक्टोपसच्या प्रजातीतीलच हा एक जीव.

Web Title: squid attacks surfing boat video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.