वृद्ध, कुपोषित हत्तीण करतेय काबाडकष्ट; निर्दयी मालकावर सोशल मीडियावरून टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 06:53 PM2019-08-16T18:53:29+5:302019-08-16T18:55:14+5:30
सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही.
कोलंबो- सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होण्यास फारसा वेळ लागत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच 70 वर्षांच्या हत्तिणीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोतील हत्तिणीची अवस्था पाहून अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. एवढी कुपोषित हत्तिणी पाहून सोशल मीडियावर सर्वच अवाक् झाले असून, हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या फोटोतल्या हत्तिणीचं नाव टिकीरी असून, तिला निवृत्त न करता तिच्याकडून काम करून घेतलं जातंय.
श्रीलंकेत दहा दिवसांच्या परेरा सणाचं आयोजन केलं जातं. वर्ल्ड एलिफंट डे साजरा केल्यानंतर दोन दिवसांनी या हत्तिणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या परेरा फेस्टिव्हलमध्ये टिकीरी नावाच्या हत्तिणीवर रंगीबेरंगी कपडे चढवण्यात आले असून, फेस्टिवलदरम्यान तिला दहा दिवस प्रत्येक रात्री काही किलोमीटर अंतर चालवले जात होते. या हत्तिणीवर एक माहुत बसलेलाही पाहायला मिळतोय.