Viral Video: सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:34 PM2022-03-14T13:34:19+5:302022-03-14T14:08:21+5:30
एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल.
लहान मुलं म्हटलं की आपण त्यांना देवाचं रुप मानतो. मुलं म्हणजे देवाघरची फुलं ही उक्ती फार प्रचलित आहे. या कोवळ्या जीवाला त्रास देण्याचा विचारही आपण करु शकत नाही. पण काही असे हैवान असतात ज्यांना की कोवळी फुलं कुस्करायला जास्त आवडतात. अशा लोकांच्या अमानुषपणासमोर जणू देवही हात टेकेल. अशाच एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल.
Panglima Perang RimauNaga या महिलेनं हा अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. हिच त्या मुलाची आई आहे. या मुलाला मारहाण करणारा या मुलाचा सावत्र पिता आहे. तो एक ट्रक ड्रायव्हर आहे. या महिलेनं दुसरं लग्न केलेलं कारण त्या लहानग्या मुलाला वडिलांचं प्रेम मिळावं. पण हे करताना तिच्यावर पश्चातापाची वेळ येईल असा विचार तिनं केला नव्हता.
व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या लहान मुलाचं रडणं आणि किंकाळ्या स्पष्ट ऐकू येतील. त्याच सावत्र पिता त्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण करतोय की ते पाहताना तुमच्या अंगावर शहारे येतील. तो मुलाच्या बेमालुमपणे कानशिलात लगावत आहे. इतके कमी काय म्हणून त्याचा हात पिरगळत आहे. बिचारी त्याची माय गयावया करत त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा हैवान थांबेल तर शप्पथ तो अजुन अमानुषपणे मुलाला मारहाण करतोय.
या महिलेनं या सावत्र पित्याचा मुलाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर पोस्ट केलाय. तिनं हे करण्यामागचं कारण म्हणजे या प्रकरणाला वाचा फुटावी. ही घटना मलेशियातील शाह आलम येथील आहे. महिलेनं सांगितलं की त्याच्या सावत्र पित्याकडून झालेला प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड व्हावा या उद्देशाने तिनं कॅमेरा बेडरुममध्ये लपवून ठेवला होता. ही घटना २५ फेब्रुवारीची असल्याचे सांगतिले जात आहे. तिने मागील महिन्यात दुसरे लग्न केले होते. त्यानंतर तिच्या या पतीने तिच्या मुलाचे हे हाल केले. दरम्यान पोलिसांनी या नराधम सावत्र पित्याला अटक केली आहे.