बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 04:01 PM2021-02-28T16:01:24+5:302021-02-28T16:36:21+5:30

Trending Viral News in Marathi : सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल. 

Story behind viral photo of 10th student marrying school teacher | बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

बोंबला! शाळेऐवजी घरातच अभ्यास व्हावा म्हणून विद्यार्थ्यानं शिक्षिकेशीच बांधली लग्नगाठ; लोक म्हणाले....

googlenewsNext

सोशल मीडियावर तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या  बातम्या पाहायला आणि ऐकायला मिळतात. काही घटना अशा असतात. ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. सध्या सोशल मीडियावर अशीच एक घटना व्हायरल होत आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं आहे की,   जेव्हा मुलं शाळेत जाऊन बोर होतात. सतत शाळेत जाण्याचा कंटाळा आल्यामुळे एका विद्यार्थ्यानं शिक्षिकेशी लग्न केलं आहे. जेणेकरून त्याला शाळेत न जाता घरच्याघरीसुद्धा अभ्यास करता येईल. 

या फोटोवर लोकांनी गमतीदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे. हा फोटो जुना असल्याचं सांगितलं जात असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना चेन्नाईची असून  २०१७ मध्ये हा प्रकार झाल्याचे सांगितलं जात आहे. एका विद्यार्थ्यांला आपल्या शिक्षिकेवर प्रेम झाल्यानं त्यानं आपल्या भावना शिक्षिकेला सांगितल्या. त्यानंतर लगेचच शिक्षिकेनंही होकार दिला. 

Petrol diesel price hike : तरूणानं पेट्रोल पंपावर भरलं पेट्रोल अन् बॅनरजवळ जाऊन मोदींना जोडले हात

त्यावेळी या विद्यार्थ्याचं वय १५ वर्ष होतं आणि शिक्षिकेचं वय २३ वर्ष होतं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या घरच्यांनीही लग्नाला परवानगी  दिली. पण त्यावेळी मुलाचं वय जास्त कमी असल्यामुळे त्यांनी फक्त साखरपुडा उरकला होता. सध्या या दोघांच्या नात्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सोशल मीडियावर यांच्या साखरपुड्याचा जुना फोटो व्हायरल होत आहे.

बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का 

हा फोटो पाहून एका सोशल मीडिया युजरनं मॉडर्न समस्येचं मॉडर्न सोल्यूशन अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर एका युजरनं लिहिले, 'हा तर खूप हुशार निघाला.' अनेकांनी चाईल्ड लाईनच्या नंबरची मागणी केली आहे. जेणेकरून या प्रकाराबाबत माहिती दिली जाईल. 
 

Web Title: Story behind viral photo of 10th student marrying school teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.