पाणीपुरीत आईस्क्रीम! आता पोटाची 'प्रयोग'शाळाच करणार की काय?...Video पाहून चक्रावले लोक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:55 AM2023-02-25T09:55:54+5:302023-02-25T09:57:21+5:30

सध्या एखादा पदार्थ किंवा डिशमध्ये प्रयोगशिलतेच्या नावाखाली काहीही करण्याचा प्रकार सुरू आहे.

street vendor prepare ice cream filled in golgappa pani puri | पाणीपुरीत आईस्क्रीम! आता पोटाची 'प्रयोग'शाळाच करणार की काय?...Video पाहून चक्रावले लोक 

पाणीपुरीत आईस्क्रीम! आता पोटाची 'प्रयोग'शाळाच करणार की काय?...Video पाहून चक्रावले लोक 

googlenewsNext

सध्या एखादा पदार्थ किंवा डिशमध्ये प्रयोगशिलतेच्या नावाखाली काहीही करण्याचा प्रकार सुरू आहे. सोशल मीडियात अशा हटके फूड प्रयोगांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. तो म्हणजे आईस्क्रीम पाणीपुरीचा. आता पाणीपुरी म्हटलं की तिखट, आंबट, गोड पाणी आणि त्यात रगड्याची चव असा बेत ठरलेला असतो. पण आता एक्सपरिमेंटच्या नावाखाली वेगवेगळ्या पाणीपुरीचे ठेले गल्लोगल्ली दिसतात. यातील हा एक आईस्क्रीम पाणीपुरीचा प्रकार व्हायरल झाला आहे. 

आता पाणीपुरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं यात शंका नाही. लहानमुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत पाणीपुरी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. पाणीपुरीला कधी कुणी नाही म्हणत नाही. पण अनेक दुकानदार याच पाणीपुरीवर अनेक प्रयोग करत असतात. असाच एक ठेलेवाला पाणीपुरीला वेगळा फ्लेवर देण्याच्या नावाखाली पुरीत रगड्याऐवजी आईस्क्रीम टाकून विकत आहे. सोशल मीडियात या अशा आगळ्यावेगळ्या पाणीपुरीच्या रेसिपीवर यूझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यातील अनेकांना हा प्रकार काही रुचलेला दिसत नाही. अनेकांना पाणीपुरीचा हा प्रकार आवडलेला नाही. काहींनी तर हे असे प्रयोग करुन लोक ग्राहकांच्या पोटाची प्रयोगशाळाच करत आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.  

फेसबुकवर हा व्हिडिओ Mi Nashikkar नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला २६ हजाराहून अधिक लाइक्स आहेत. पण पाणीपुरीवरील असे प्रयोग काही युझर्सना आवडलेले दिसत नाहीत. एकानं तर आता हे पाहून पाणीपुरी खाणंच सोडून द्यावसं वाटू लागलंय, असं म्हटलं आहे. तर काहींनी फूड एक्सपरिमेंटच्या नावाखाली काय-काय पाहावं लागतंय अशी भावना व्यक्त केली आहे.

Web Title: street vendor prepare ice cream filled in golgappa pani puri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न