Physics Wallah च्या लाइव्ह क्लासमध्ये विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 03:18 PM2023-10-06T15:18:07+5:302023-10-06T15:18:43+5:30

सोशल मीडियावर Physics Wallah चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Student Beats Teacher with Shoe in Physics Wallah's Live Class; The video went viral... | Physics Wallah च्या लाइव्ह क्लासमध्ये विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

Physics Wallah च्या लाइव्ह क्लासमध्ये विद्यार्थ्याची शिक्षकाला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

googlenewsNext

Physics Wallah Teacher Beaten In Live Class: भारतातील लोकप्रिय एडटेक कंपनी Physics Wallah पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात ऑनलाईन क्लासदरम्यान Physics Wallah च्या शिक्षकाला विद्यार्थायने मारहाण केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंगवर आल्याने अनेक विद्यार्थ्यांनी तो रेकॉर्ड करुन व्हायरल केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षक वर्गात शिकवत असल्याचे दिसून येते. यावेळी अचानक एका विद्यार्थी त्यांच्यावर हल्ला करतो आणि शिक्षकाला आधी गालात चापट आणि नंतर चपलेने मारहाण करू लागला. या मारहाणीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर घर के कलेश नावाच्या पेजने शेअर केला आहे. अपलोड केल्यापासून हा 723K पेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. 

Physics Wallah यापूर्वीही वादात अडकला 
Physics Wallah याआधीही वादात सापडला आहा. Physics Wallah चे प्रसिद्ध शिक्षक तरुण कुमार, मनीष दुबे आणि सर्वेश दीक्षित यांनी कंपनीचे संस्थापक अलख पांडे यांच्याशी मतभेद असल्याचा दावा करत Physics Wallah ला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या व्हिडिओमध्ये, कुमार, दुबे आणि दीक्षित यांनी दावा केला होता की, Physics Wallah चे शिक्षक पंकज सिजारिया यांनी त्यांच्यावर लाच घेतल्याचे आरोप केले. Physics Wallah चे वातावरण आता विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहिले नाही, असेही सांगण्यात आले. 

 

Web Title: Student Beats Teacher with Shoe in Physics Wallah's Live Class; The video went viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.