धावत्या स्कुटीवर हा करतोय होम वर्क, नेटकरी म्हणाले इतका अभ्यासू मुलगा जगात सापडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 04:20 PM2021-09-14T16:20:21+5:302021-09-14T16:22:10+5:30

आता आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुमच्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील. हा व्हिडिओ पाहुन ते दिवस परत यावेत असंही तुम्हाला वाटेल. तुम्हाला तुमच्या आईचीही आठवण येईल आणि तुम्हाला परत शाळेत जावसं वाटेल

student doing homework on scooty while his mother is driving goes viral on social media | धावत्या स्कुटीवर हा करतोय होम वर्क, नेटकरी म्हणाले इतका अभ्यासू मुलगा जगात सापडणार नाही

धावत्या स्कुटीवर हा करतोय होम वर्क, नेटकरी म्हणाले इतका अभ्यासू मुलगा जगात सापडणार नाही

Next

आता आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यावर तुमच्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील. हा व्हिडिओ पाहुन ते दिवस परत यावेत असंही तुम्हाला वाटेल. तुम्हाला तुमच्या आईचीही आठवण येईल आणि तुम्हाला परत शाळेत जावसं वाटेल. हा व्हिडिओ @DoctorAjayita यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे आणि आतापर्यंत याला २ लाखाच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये इतकं काय लपलंय हे शोधुन काढण्यासाठी हा व्हिडिओच पाहा.

सोशल मिडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतील मुलगा आपल्या टिचरला इतका घाबरतो की तो चक्क चालत्या स्कुटीवर अभ्यास करत आहे. भारतात अशा जुगाडू लोकांची कमतरता नाही मग हा मुलगा कसा मागे राहिल. त्याची आई स्कुटी चालवतेय आणि हा पठ्ठ्या मागच्या सीटवर बसून अभ्यास करतोय. त्याची लहान बहीणही स्कुटरचालवणाऱ्या आईच्या सीटपुढे उभी आहे. 

हा व्हिडिओ बघुन अनेकांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. कुणाला थ्री इडियट्समधल्या वीरु सहस्त्रबुद्धेची आठवण झाली. तर कुणी म्हणतंय काश हे दिवस परत आले तर काय मजा येईल. लोकांच्या कमेंट्स काहीही असोत पण धावत्या स्कुटीवर अभ्यास करणाऱ्या मुलाची दाद द्यायला हवी. हा व्हिडिओ त्याच स्कुटीच्या बाजूने जाणाऱ्या एका प्रवाशाने काढला असावा असं दिसतंय,

Web Title: student doing homework on scooty while his mother is driving goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.