पेपरमध्ये विद्यार्थ्याने काढली हृदयाची आकृती, त्यात जे लिहिलं ते वाचून शिक्षक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:39 PM2024-06-24T15:39:53+5:302024-06-24T15:50:08+5:30

पेपरमध्ये हृदयाची आकृती काढून त्याच्या वेगवेगळ्या भागांना नाव देऊन त्यांची कामे लिहिण्यास सांगिण्यात आलं होतं. एका मुलाने यात काय लिहिलं ते वाचून तुम्हीही पोटधरून हसाल.

Student draw diagram of heart in exam wrote girlfriends names in different inside | पेपरमध्ये विद्यार्थ्याने काढली हृदयाची आकृती, त्यात जे लिहिलं ते वाचून शिक्षक हैराण

पेपरमध्ये विद्यार्थ्याने काढली हृदयाची आकृती, त्यात जे लिहिलं ते वाचून शिक्षक हैराण

नेहमीच शाळेतील किंवा कॉलेजमधील पेपरमध्ये मुलांनी अजब अजब गोष्टी लिहिल्याच्या घटना समोर येत असतात. अनेकदा या पेपरचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एका विद्यार्थ्याचा पेपर आणि त्यात त्याने लिहिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे. पेपरमध्ये हृदयाची आकृती काढून त्याच्या वेगवेगळ्या भागांना नाव देऊन त्यांची कामे लिहिण्यास सांगिण्यात आलं होतं. एका मुलाने यात काय लिहिलं ते वाचून तुम्हीही पोटधरून हसाल.

हृदयाची आकृती काढून दिली मुलींची नावे

इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ memes_connection नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. मात्र यातील उत्तरपत्रिका खरी आहे की खोटी याचा आम्ही दावा करत नाहीत. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पेपरमध्ये प्रश्न आहे की, हृदयाची आकृती काढा, वेगवेगळे अवयव दाखवा आणि त्यांच्या कामाबाबत लिहा. एका मुलाने आकृती तर काढली पण त्यानंतर त्याने जे लिहिलं कमाल आहे.

हृदयाच्या अवयवांना लेबलिंग करण्याऐवजी त्याने हृदयाच्या वेगवेगळ्या अवयवांना त्याच्या गर्लफ्रेंड्सची नावे दिली आहेत. आकृतीत त्याने प्रिया, नमिता, हरिता, रूपा, पूजा अशी मुलींची नावे लिहिली आहेत. सोबत या अवयवांची माहिती देण्याऐवजी या मुलींची माहिती दिली आहे. प्रियाच्या नावासमोर मुलाने लिहिलं की, ती नेहमीच त्याच्यासोबत इन्स्टावर चॅटींग करते. ती त्याला आवडते. रूपासमोर लिहिलं की, तो रूपासोबत स्नॅपचॅटवर चॅटींग करतो. ती फार सुंदर आणि क्यूट आहे. नमिताच्या नावासमोर लिहिलं की, ही शेजाऱ्याची मुलगी आहे. तिचे केस लांब आहेत आणि डोळे मोठे आहेत. पूजा या मुलाची एक्स गर्लफ्रेंड आहे. तो तिला विसरू शकत नाही. हरिता त्याची क्लासमेट आहे.

Web Title: Student draw diagram of heart in exam wrote girlfriends names in different inside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.